युती शासनाच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 10:12 PM2018-09-30T22:12:54+5:302018-09-30T22:14:02+5:30

राज्यात युती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ६४ वर्षांच्या म्हातारीपासून कोवळ्या मुलीही सुरक्षित नाही. क्राईम रेट वाढला.

Atrocities against women increased during the coalition government | युती शासनाच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले

युती शासनाच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले

Next
ठळक मुद्देचित्रा वाघ : दारव्हा येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : राज्यात युती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ६४ वर्षांच्या म्हातारीपासून कोवळ्या मुलीही सुरक्षित नाही. क्राईम रेट वाढला. शिक्षेचे प्रमाण मात्र कमी असताना गृह खाते उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केला.
येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आयोजित महिला मेळावा व महिला बचत गट मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग होते. मंचावर प्रदेश सरचिटणीस वसंतराव घुईखेडकर, माजी जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले,ज्येष्ठ नेते अ‍ॅड.शंकराव राठोड, उत्तमराव शेळके, राकाँ महिला जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत, राजेंद्र पाटील, डॉ.महेंद्र लोढा, निलीमा काळे उपस्थित होत्या. चित्राताई वाघ म्हणाल्या, सध्याच्या काळात कोणताही घटक सुखी नाही. ३० टक्के तरुणाईने विश्वास ठेवून युतीचे सरकार आणले. मात्र बेरोजगारीमुळे आज त्या तरुणांचा आक्रोश पाहायला मिळतो. वाढत्या महागाईमुळे महिलांचे बजेट कोलमडले असुन त्यांना घर कसे चालवावे, असा प्रश्न पडला. मात्र सरकार ठोस उपाययोजना करीत नाही. ‘उज्वला’ योजनेतून केवळ गॅस देऊन चालत नाही, तर त्यासाठी ९०० रूपयांचे सिलिंडर घ्यावे लागते, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी अर्ध्या किमतीत गॅस सिलिंडर, सॅनिटरी पॅड जीएसटी मुक्त करावे, आदी मागण्या त्यांनी केल्या.
कार्यक्रमाला हरिश कुडे, लालजी राऊत, नानाभाऊ भोकरे, अ‍ॅड.दिलीप देशमुख, मनीषा काटे, प्रवीण खेवले, लालसिंग राठोड, युवराज अर्मळ, सारिका ताजने, इरफान अकबानी आदी उपस्थित होते. संचालन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष गोदावरी पाटील, प्रास्ताविक प्रा.सुषमा गावंडे, तर आभार शहराध्यक्ष नलिनी राठोड यांनी मानले. यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष प्रा.चरण पवार, शहराध्यक्ष नासिर शेख, प्रा.सुभाष गावंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

बोंडअळीची मदत, विमा भरपाई, हल्लाबोलचे यश
बोंडअळीची मदत आणि पीक विम्याची नुकसान भरपाई, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नेर तालुक्यात भेट दिल्यानंतर केलेला पाठपुरावा आणि पक्षातर्फे यवतमाळ ते नागपूर हल्लाबोल मोर्चा काढून केलेल्या आंदोलनाचे यश असल्याचा दावा महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ आणि आमदार ख्वाजा बेग यांनी पत्रकार परिषदेत केला. आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ुजनतेशी संवाद साधून या सरकारचे खरे रूप उघड करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. शेतमालाला हमीभाव, स्वामीनाथन आयोग लागू करणे, दोन कोटी नोकऱ्या, महागाई कमी करणे, महिला सुरक्षा, टोलमुक्त व खड्डेमुक्त महाराष्ट्र, असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र एकही पूर्ण केले नसून हे केवळ फेकू सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला.

Web Title: Atrocities against women increased during the coalition government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.