वकिलास मारहाणप्रकरणी पोलीस शिपायावर अॅट्रॉसिटी
By admin | Published: August 10, 2016 01:16 AM2016-08-10T01:16:01+5:302016-08-10T01:16:01+5:30
वकिलास शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या पोलीस शिपायाविरुद्ध अॅट्रोसिटी अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
दारव्हा : वकिलास शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या पोलीस शिपायाविरुद्ध अॅट्रोसिटी अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दारव्हा वकील संघाच्या निवेदनावरून येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने गुन्हा नोंदविण्यासंदर्भात आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
शनिवारला न्यायालय परिसरातील वाहनतळावर दुचाकी लावण्यावरून सेवेत असलेले पोलीस शिपाई श्रावण राऊत यांनी अॅड.रूपचंद कठाणे यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. अॅड.कठाणे यांच्यावरच गुन्हा दाखल करून आपल्या तक्रारीवर कारवाई करण्यास विलंब लावला जात असल्यामुळे वकील संघाने जिल्हा व सत्र न्यायालयाकडे तक्रार देवून गुन्हा नोंदविण्यासंदर्भात पोलिसांना आदेश द्यावे, अशी विनंती केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस शिपाई श्रावण राऊत यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटी अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. ठाणेदार गौतम यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दारव्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड.मनोहर राजगुरे, उपाध्यक्ष अॅड.अमोल चिरडे, सचिव अॅड.संघपाल खंडारे, ज्येष्ठ सदस्य अॅड.देशपांडे, अॅड.भेंडे, अॅड.राजेश जाधव, अॅड.नितीन जवके, अॅड.सचिन गोरले, अॅड.रूपचंद कठाणे, अॅड.मजहर खान, अॅड.आशीष वानखडे, अॅड.जाबीरभाई, अॅड.सोनने, अॅड.निचळे, अॅड.तुरकाने, अॅड.गोपाल डहाके, अॅड.शरद राठी, अॅड.मनोज कावळे, अॅड.संदीप उके, अॅड.प्रमोद भगत आणि इतर सदस्य उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)