वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 10:01 PM2017-11-28T22:01:10+5:302017-11-28T22:01:27+5:30

तालुक्यातील कवडीपूर (तांडा) येथे वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या वीज वितरणच्या पथकावर ग्रामस्थाने हल्ला केला.

The attack on the MSEDCL, which went to catch electricity stolen | वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला

वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला

Next
ठळक मुद्देअभियंता जखमी : पुसद तालुक्याच्या कवडीपूर येथील घटना

आॅनलाईन लोकमत
पुसद : तालुक्यातील कवडीपूर (तांडा) येथे वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या वीज वितरणच्या पथकावर ग्रामस्थाने हल्ला केला. यात सहायक अभियंता जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
तालुक्यात वीज चोरीचे प्रमाण वाढल्याने पुसद ग्रामीण-२ वितरण केंद्राचे पथक मंगळवारी कवडीपूर तांडा येथे पोहोचले. या पथकाकडे वीज चोरी पकडण्याचे काम सोपविण्यात आले होते. सहायक अभियंता एस.एस. इवनाते यांच्या नेतृत्वातील सहा कर्मचाºयांचे पथक कवडीपूर येथे पोहोचले. या पथकाने कवडीपूर येथील तुकाराम राठोड, रामराव भीवा जाधव, अरुण जनार्दन चव्हाण, प्रमोद धाडसू आडे यांच्या घरातील वीज चोरी पकडून पथकाने पंचनामा केला.
यानंतर सदर पथक प्रकाश सकरू जाधव यांच्या घरी गेले. तेथे घरातील इलेक्ट्रीक मोटरची पाहणी केली असता ती बंद आढळली. मात्र घरातील लाईन सुरू होती. त्याची पाहणी केली असता प्रकाश जाधव याने जवळपास ७०० फूट अंतरावरील रोहित्रावरून थेट काळ्या रंगाची सर्व्हिस केबल टाकल्याचे आढळून आले. त्याने चोरीचा वीज पुरवठा घेतल्याचे दिसून आले. या केबलमुळे काही नागरिकांना धोका उद्भवू शकत होतो, त्यामुळे ती काढणे गरजेचे होते. वीज वितरण पथकातील कर्मचाºयांना सहायक अभियंता इवनाते यांनी केबल काढण्याचे आदेश दिले. लाईनमन हरिदास सोळंके पोलवर चढून केबल काढत असताना किशोर जाधव यांनी अडथळा निर्माण केला. त्यानंतर संतापलेल्या किशोर जाधव व त्याचा मुलगा शुभम जाधवने वीज कर्मचाºयांचे मोबाईल हिसकले. नंतर कर्मचाºयांना थापडांनी मारहाण करून पेंचीस व पेचकसने पथकावर हल्ला केला. किशोरच्या पत्नीनेही कुकरने मारहाण केली. यात सहायक अभियंता इवनाते जखमी झाले. त्यांना सोडविण्यासाठी गेलेल्या इतरांवरही पेंचीस व पेचकसने हल्ला करण्यात आला. लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
अशोक पवार यांच्या खिशातील वीज बिलाचे दहा ते बारा हजार रुपये व त्याच्या पावत्या फाडण्यात आल्या. पथकासोबत असलेला पोलीस कर्मचारी आनंद कुबडे याने पवार यांना सोडविले. सहायक अभियंता इवनाते यांच्या तक्रारीवरून पुसद ग्रामीण पोलिसांनी किशोर सकरु जाधव, शुभम किशोर जाधव, बिंदूबाई किशोर जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वीज अधिकारी, कर्मचारी संतप्त
या घटनेने वीज कर्मचारी संतप्त झाले. त्यांनी कृती समिती स्थापन करून बुधवारी धरणे आणि निदर्शने करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. शुभम जाधव अद्याप पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The attack on the MSEDCL, which went to catch electricity stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.