वीज वसुली मोहिम राबविणाऱ्या कर्मचाऱयांवर हल्ला, यवतमाळ जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 12:36 PM2021-03-16T12:36:08+5:302021-03-16T12:36:42+5:30
Yawatmal News यवतमाळ जिल्ह्यात वीज बिल न भरणाऱ्याची वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम विद्युत मंडळाने सुरु केली आहे. यामुळे नागरिकांत तीव्र असंतोष आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत घोषणा करून सर्वसामान्यांना वीज बिलांवर कोणताही दिलासा न दिल्याचे स्पष्ट संकेत दिल्यानंतर वीज बिल वसुलीला गती मिळाली. यवतमाळ जिल्ह्यात वीज बिल न भरणाऱ्याची वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम विद्युत मंडळाने सुरु केली आहे. यामुळे नागरिकांत तीव्र असंतोष आहे. अशातच जिल्ह्यातील पुसद तालुक्याच्या शेंबाळपिंपरी येथे वीज कनेक्शन कापायला गेलेल्या कर्मचाऱयांवर संतप्त ग्राहकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
या घटनेचा VDO आता समोर आला आहे . कर्मचाऱयांना मारहाण प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही विद्युत मंडळाचे कर्मचारी अरुण पेंदे यांच्याकडे थकबाकी असल्याने त्यांच्या दुकानात जाऊन त्यास सदर दुकानातील बिल भरणे बाबत विनंती केली असता अरुण यांनी वादावादी करून मारहाण केली. वीज बीलांमध्ये कोणतीही सवलत न मिळाल्याने नागरिकात आधीच असंतोष आहे. यामुळे भविष्यातही अश्या मारहाणीच्या घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.