वार्ताहरावर हल्ला करणाऱ्यास अटक
By admin | Published: April 7, 2017 02:23 AM2017-04-07T02:23:33+5:302017-04-07T02:23:33+5:30
नेर तालुक्यातील सोनखासचे ‘लोकमत’ वार्ताहर पांडुरंग भोयर यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला अखेर लाडखेड पोलिसांनी
कारागृहात रवानगी : सोनखास येथील प्रकरण
यवतमाळ : नेर तालुक्यातील सोनखासचे ‘लोकमत’ वार्ताहर पांडुरंग भोयर यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला अखेर लाडखेड पोलिसांनी गुरुवारी पहाटे यवतमाळातून अटक केली. दारव्हा न्यायालयापुढे हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
सोनखास येथील बसस्थानकावर वार्ताहर पांडुरंग भोयर यांच्यावर गावातीलच आरोपी मुरलीधर नारायण ठाकरे याने सोमवारी हल्ला केला होता. मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली होती. या प्रकरणी लाडखेड पोलिसांनी ठाकरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र घटनेपासून ठाकरे पसार झाला होता. लाडखेड पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान गुरुवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास मुरलीधर ठाकरे याला लाडखेड पोलिसांनी यवतमाळ येथे अटक केली. त्याला दुपारी दारव्हा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी यवतमाळ कारागृहात केली. या प्रकरणाचा तपास दारव्हाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाडखेडचे ठाणेदार नरेश रणधीर, पोलीस उपनिरीक्षक रवी वावडे, गजानन शेंदूरकर करीत आहेत.