भारतीय संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न : प्रा. श्याम मानव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 04:54 PM2024-08-24T16:54:18+5:302024-08-24T16:56:29+5:30

Yavatmal : उमरखेड येथे 'संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव'वर व्याख्यान

Attempt to attack Indian Constitution : Prof. Shyam Manav | भारतीय संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न : प्रा. श्याम मानव

Attempt to attack Indian Constitution : Prof. Shyam Manav

लोकमत न्यूज नेटवर्क 
उमरखेड :
स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता यावर निर्माण केलेले संविधान हे प्रत्येक नागरिकासाठी सुरक्षित जीवनाची हमी देते. संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे. संविधान वाचविण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी केले आहे.


राजस्थानी भवन येथे बुधवारी आयोजित 'संविधान बचाव महाराष्ट्र बचाव' या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार विजयराव खडसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य दशरथ मडावी, सुरेश झुरमुरे उपस्थिते होते. अभ्यासपूर्ण व्याख्यानातून प्रा. मानव यांनी सद्यःस्थितीत चाललेल्या देशाच्या व राज्याच्या अनागोंदी कारभारावर सडकून टीका केली. सरकारने चालविलेल्या हुकूमशाही कारभाराला रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले. 


जातीय सलोखा बिघडविण्याचे व अंधश्रद्धा, बुवाबाजीला खतपाणी घालण्याचे काम करीत आपली सत्ता टिकविण्यासाठी विरोधकांनाही नामोहरम करीत जेलमध्ये घालण्याचा कुटील प्रयत्न केंद्र सरकारने दहा वर्षांच्या कार्यकाळात केल्याचा आरोप प्रा. मानव यांनी केला. काँग्रेस सरकारच्या काळातील पायाभूत सरकारी कंपन्या बड्या उद्योगपतींना विकून देशाला कंगाल करण्याचा घाट सरकार करीत आहे. संविधानाशी फारकत घेऊन सरकारची वाटचाल सुरू आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने व दिवसेंदिवस नैसर्गिक संकटात वाढ होत असल्याने देशात शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढत आहे. संविधान निर्मितीमागे देश हिताची तळमळ होती. संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले. ते एससी, एसटी, ओबीसी यांच्यासाठीच आहे, असा संभ्रम लोकांमध्ये पसरविण्यात येत असल्याचे प्रा. मानव म्हणाले. यावेळी २७ वर्षांपासून उमरखेड तालुक्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम निस्वार्थ भावनेने करून वैज्ञानिक दृष्टिकोन ग्रामीण भागात रुजवणारे अंनिसचे अध्यक्ष माधवराव चौधरी व सचिव राजीव गायकवाड यांचा श्याम मानव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन देवानंद मोरे यांनी केले.
 

Web Title: Attempt to attack Indian Constitution : Prof. Shyam Manav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.