कोयता हातात ठेवून हल्ल्याचा प्रयत्न, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 10:10 PM2022-05-13T22:10:34+5:302022-05-13T22:11:20+5:30

तीन दिवस लोटूनही कुठलीही कारवाई पोलिसांनी केली नसल्याने नागरिक सुद्धा आश्चर्य व्यक्त करीत आहे, पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील याकडे लक्ष देतील का अशी चर्चा सुद्धा सध्या सुरू आहे.

Attempt to attack with sickle in hand, video goes viral on social media | कोयता हातात ठेवून हल्ल्याचा प्रयत्न, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

कोयता हातात ठेवून हल्ल्याचा प्रयत्न, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

googlenewsNext

यवतमाळ - कोर्टात सुरू असलेला खटला परत का घेत नाही म्हणून एका माथेफिरूने चक्क भर रस्त्यात कोयता घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र गावातील मंडळींनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला कोइता घेऊन हल्ला करीत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

माझ्या पुतण्यावर सुरू असलेला मारहाणीचा खटला परत का घेत नाही म्हणून आर्णी तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे महेश अशोक राठोड व अशोक नरसिंग राठोड यांनी गावातीलच राहणाऱ्या भिमराव चव्हाण यांच्यावर भर रस्त्यावर कोयता ने मारहाण करण्याचा प्रयत्न केला, सदर घटनेची तक्रार भीमराव चव्हाण यांनी आर्णी पोलीस स्टेशनला दिली मात्र पोलीस भीमराव चव्हाण यांनी अर्ज दिला असून तो तपासात आहे असं बीट जमादार सांगतात. तीन दिवस लोटूनही या गंभीर घटनेची दखल आर्णी पोलिसांनी घेतली नसल्याचे दिसते, वर्ष सुरू होताच जिल्ह्यात खुणाची मालिका सुरू झाली आता ब्राह्मणवाडा सारख्या छोट्याशा गावात शुल्लक वादावरून चक्क कोयत्याने हल्ला करण्याचा प्रकार समोर आला आहे अशांना पोलिसांनी वेळीच यांच्या मुसक्या आवळल्या नाहीतर मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर घटनेतील आरोपी बिट जमादार याच्या परिचित असल्याने कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे, तीन दिवस लोटूनही कुठलीही कारवाई पोलिसांनी केली नसल्याने नागरिक सुद्धा आश्चर्य व्यक्त करीत आहे, पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील याकडे लक्ष देतील का अशी चर्चा सुद्धा सध्या सुरू आहे.

Web Title: Attempt to attack with sickle in hand, video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.