पोलीस मुख्यालयात राखीव शिपायांच्या ड्युटीचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:09 PM2017-10-28T23:09:23+5:302017-10-28T23:09:39+5:30

शिस्तीचे खाते म्हणून ओळखल्या जाणाºया पोलीस दलातच चक्क ड्युट्यांचा लिलाव केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

Auction of reserved soldiers in police headquarters | पोलीस मुख्यालयात राखीव शिपायांच्या ड्युटीचा लिलाव

पोलीस मुख्यालयात राखीव शिपायांच्या ड्युटीचा लिलाव

Next
ठळक मुद्देघरूनच आॅनड्युटी : गार्ड ड्युटीचीही लागते बोली

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिस्तीचे खाते म्हणून ओळखल्या जाणाºया पोलीस दलातच चक्क ड्युट्यांचा लिलाव केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. येथील मुख्यालयात या परंपरेने पाय रोवले आहे. राखीव पोलीस कर्मचाºयांना रजा मिळविण्यासाठी चक्क पैसे मोजावे लागत आहे. दुसरीकडे अनेक पोलीस राहत्या घरूनच ‘आॅनड्युटी’ असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा पोलीस मुख्यालयात सुमारे ५०० पोलीस राखीव आहेत. यात नव्या जुन्यांचा समावेश आहे. येथे मेस ते ड्युटी लावण्यापर्यंचा सर्वच कारभार मुख्यालयातील राखीव निरीक्षक कार्यालयातून चालतो. मात्र येथील नियम व प्रथा अनाकलनीय आहे. पोलीस दलात मोठे स्वप्न उराशी बाळगून दाखल झालेल्या अनेक युवकांना येथून खºया दुनियेचे वास्तव कळायला सुरूवात होते. या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची किंमत ठरली आहे. ती मोजल्याशिवाय काहीच मिळत नाही.
नियम काही असो, त्याचे येथे काहीच मोल नसल्याचे आढळते. नोकरीच्या भितीने नवख्यांकडून बंडाची भाषा तर सोडाच, साधी विचारणादेखील केली जात नाही. परिणामी येथे ठाण मांडून बसलेल्या मुक्कामी यंत्रणेचे चांगलेच फावत आहे. येथील ड्युटी रजिस्टरवर नोंद असलेल्या कर्मचाºयांपैकी अनेक जण घरी बसूनच आॅनड्युटीचे लाभ घेत असल्याची चर्चा आहे. पोलीस ठाणे, किंवा इतर कोणत्याही ठिकाणी कार्यरत अधिकारी, कर्मचाºयांना साप्ताहिक रजेव्यतिरिक्त कोणत्याच शासकीय सुटीचा लाभ मिळत नाही. मात्र मुख्यालयातील राखीव कर्मचाºयांना इतर शासकीय कर्मचाºयाप्रमाणे सोयीस्करपणे आॅनड्युटी रजा दिली जाते, हे विशेष.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौºयावर आले असताना त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी या कार्यालयात ड्युटी असलेला एक पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यांना परस्परच रजा मंजूर करण्यात आली होती. सामान्य कर्मचाºयांना कौटुंबिक कामे, आजारपण आदींसाठी रजा दिली जात नाही. मुख्यालयातील कर्मचाºयांना मात्र परस्पर रजा मंजूर केल्याचे यावरून स्पष्ट होते. मुख्यालयात नवख्यांना तर सापत्न वागणूक मिळते.
त्यामुळे त्यांच्या मनातील पोलीस खात्याबद्दल असलेला आदर भावच संपुष्टात येतो. अनेकदा तर येथे सुटी आणि ड्युटीवरून मोठे वादही होतात. मात्र ही प्रकरणे बाहेर येऊ दिली जात नाही. यातून मुख्यालयात दरमहा लाखोंची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. यात प्रामाणिक कर्मचारी मात्र चांगलेच भरडले जात आहे.
नावांचे गौडबंगाल
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काही कर्मचाºयांना विश्वासात घेऊन विचारपूस केल्यास येथील चुकीच्या प्रथा, परंपरा उघड होऊ शकतात. त्यांनी अकस्मात भेट देऊन ड्युटी रजिस्टर तपासल्यास मोठे घबाड हाती लागू शकते. यातून घरबसल्या आॅनड्युटीचे गौडबंगाल बाहेर येऊ शकते. गार्ड ड्युटीवरील कर्मचाºयांची यादी तपासल्यास काही ठराविक नावे एका क्रमानेच दिसतील. हा प्रकार थांबल्यास प्रामाणिकपणे सेवा देणाºया पोलीस कर्मचाºयांना न्याय मिळण्याची शक्यता आहे.

दर आठवड्याला नियमित तपासणी केली जाते. अशी कुठलीही तक्रार अद्याप प्राप्त नाही. संबधितांना काही अडचण असेल, तर माझ्याकडे तक्रार करावी. दोषींवर कारवाई केली जाईल
- एस.व्ही. तामगाडगे
पोलीस उपधीक्षक (गृह)
यवतमाळ .

Web Title: Auction of reserved soldiers in police headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.