यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत 'ऑडिट' तिथे घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 03:19 PM2024-09-12T15:19:53+5:302024-09-12T15:20:39+5:30
कोल्ही शाखेत साडेतीन लाखांचे भगदाड : एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई, रक्कम वाढण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकऱ्यांची बैंक ऑडिट न झालेल्या ३६ शाखा असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत भ्रष्टाचाराची मालिका सुरूच आहे. जिथे ऑडिट तिथे घोटाळा बाहेर येत आहे. दोन आठवड्यापूर्वी ऑडिट झालेल्या कोल्ही शाखेत साडेचार लाख रुपयांचे भगदाड पाडल्याचे पुढे आले. या प्रकरणात अडीच वर्षांपूर्वी बँकेत लागलेल्या लिपिकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या निमित्ताने मागील पाच वर्षांत ऑडिट न झालेल्या ३६ शाखांचा विषय पुढे आला आहे.
कोट्यवधी रुपयांचे घोटाळे बाहेर येत असताना शाखांचे ऑडिट टाळले जात आहे. ऑडिटसाठी बँकेचे पदाधिकारी, संचालक आग्रही का नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे सहकार विभागाचीही तेवढीच जबाबदारी आहे. या विभागाने ठराविक कालावधीत बँकेकडून अहवाल घ्यायला पाहिजे. तो घेतला जाण्याविषयी शंकाच आहे. कर्मचाऱ्यांचे टेबल बदलण्यासंदर्भात 'नाबार्ड'चे धोरणही बँकेने पायदळी तुडविले आहे. अलीकडेच ऑडिट झालेल्या जांबबाजार शाखेत चार कोटी रुपयांचा घोटाळा बाहेर आला असेच मोठ मोठे घोटाळे ३६ शाखांचे ऑडिट झाल्यास बाहेर येण्याची शक्यता आहे. मागील तीन वर्षांत १० शाखांनी केलेल्या घोटाळ्याचा आकडा दहा कोटी रुपयांवर गेला आहे. सर्व शाखांचे ऑडिट झाल्यास बँकेच्या तिजोरीला किती भगदाड पाडले हे पुढे येणार आहे. ऑडिटसाठी संचालकांनी आग्रही असावे, अशी बँकेचे सभासद, ठेवीदार, खातेदारांची अपेक्षा आहे.
ऑडिट न झालेल्या ३६ शाखा
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ३६ शाखांचे ऑडिट झाले नाही. यामध्ये त्यातील काळी दाँ, पुसद, महागाव, मुळावा, पिंपळगाव कान्हा, हिवरा, उमरखेड, ढाणकी, फुलसावंगी, नेर, शिरसगाव पांढरी, लोही, मालखेड, दारव्हा, बोरीअरब, कामठवाडा, चिखलगाव-भांडेगाव, सावळी सदोबा, जवळा, महागाव कसबा, लोणबेहेळ, आर्णी, कलगाव, वसंतनगर, मुकुटबन, पाटण, झरी जामणी, शिबला, मारेगाव, कुंभा, मार्डी, पाटणबोरी, घाटंजी, पार्टी नस्करी, राळेगाव, झाडगाव या शाखांचा समावेश आहे.
एक कोटींचा 'आरटीजीएस'चा घोळ
जांबबाजार शाखेने एका व्यक्त्तीचे तीन वाहनांचे कर्ज घोटाळा करून नील केले. याच शाखेत एक कोटी रुपयांचा 'आरटीजीएस घोटाळा झाल्याची माहिती आहे. घोटाळेबाजांनी काही रक्कम विशिष्ट खात्यावर आरटीजीएस केली. लगेच काढून घोटा ळेबाजांच्या मालिकेतील व्यक्तीला सोपविली. बँकेने या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. कारवाई होणार हे निश्चित असल्याने संबंधित कर्मचाऱ्याऱ्यांनी आरटीजीएसची रक्कम ज्याच्याकडे सुपूर्द केली त्याच्याकडे मागणी केली. परंतु, या व्यक्त्तीने रक्कम परत करणे तर दूर उलट कारवाई होऊ न देण्यासाठी जादा रक्कम उकळल्याची माहिती आहे. आमच्या विभागात बँकेचे नाही, आमचे नियम चालतात, अशी भाषा आपले कर्ज खाते निल करून घेणाऱ्यांकडून वापरली जाते. या परिसरात नव्यानेच बदलून गेलेल्या कर्मचा- यांनाही त्यांच्याच नियमाने वागावे लागत असल्याची माहिती आहे.
"विशेष ऑडिटरकडून सर्व शाखांचे ऑडिट व्हावे यासाठी पाठपुरावा केला जाईल. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचेही धोरण ठरविण्यात आले आहे. कर्मचारी जास्त काळ एकाच ठिकाणी राहणार नाही, असे हे धोरण असेल. - जर्मनी मध्ये नोकरीची संधी जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय अनुभव आणि नवीन संस्कृती यांचा आनंद घेण्याची इच्छा असेल."
- स्नेहल भाकरे, संचालक, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक