अवधूतची अकाली एक्झीट चटका लावून गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 09:53 PM2018-05-07T21:53:16+5:302018-05-07T21:53:16+5:30
पाणी फाऊंडेशच्या वॉटर कप स्पर्धेत अगदी सुरुवातीपासून श्रमदानात पुढाकार घेणाऱ्या अवधूत भगवान वैद्य (२५) या नरसापूर येथील युवकाची एक्झीट सर्वांना चटका लाऊन गेली. त्याचे रविवारी सकाळी आकस्मित निधन झाले.
गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : पाणी फाऊंडेशच्या वॉटर कप स्पर्धेत अगदी सुरुवातीपासून श्रमदानात पुढाकार घेणाऱ्या अवधूत भगवान वैद्य (२५) या नरसापूर येथील युवकाची एक्झीट सर्वांना चटका लाऊन गेली. त्याचे रविवारी सकाळी आकस्मित निधन झाले.
नरसापूर येथे पाणी फाऊंडेशनचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. गावातील हजारो हात गाव पाणीदार करण्यासाठी झटत आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात युवक घाम गाळत आहे. स्पर्धेतील श्रमदानात अवधूत वैद्य हा युवकही मागे नव्हता. अगदी सुरुवातीपासून आणि तेवढ्याच मनापासून त्याने गावातील युवकांना एकत्र केले. पाण्याचे महत्व पटवून दिले.
अवधूतने श्रमदानाचे महत्व पटवून देत दुष्काळावर मात करण्याचा संकल्प केला. त्यामुळे इतर युवकांमध्येही विश्वास जागृत झाला. एक-एक करत शेकडो युवक या चळवळीत सहभागी झाले. श्रमदानाच्या कामात सर्वांनी झोकुन दिले. गावकºयांसोबत मागील एक महिन्यापासून अखंडीतपणे अवधूत हा गावातील दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या प्रयत्नाला गावकऱ्यांनीही तेवढीच साथ दिली. परंतु अवधूतच मात्र सर्वांची साथ सोडून कायमचा निघून गेल्याने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. अवधूतचे स्वप्न पूर्ण करण्याचा चंग गावकऱ्यांनी बांधला आहे. दुष्काळावर मात करणे हीच खरी अवधूतसाठी श्रध्दाजंली ठरेल, सांगत पुन्हा नव्याने जोमाने गावकरी कामाला लागले आहे.
डफडी वाजवून जनजागृती
अवधूत हा डफडी वाजवून सर्वांना श्रमदानास निघण्यासाठी प्रवृत्त करायचा. रोज सकाळ-संध्याकाळ त्याचा हा उपक्रम सुरु असायचा. यामध्ये युवकही त्यांना मोलाची साथ देत होते. एकंदरीत तो अतिशय उत्साहाने डफडी वाजवून जनजागृती करायचा. त्यामुळे आता डफडी कोण वाजविणार या प्रश्नासोबतच अवधूतची जागा कोण भरुन काढणार, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.