अवनीचे बछडे शिकारीसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 10:36 PM2018-12-12T22:36:03+5:302018-12-12T22:36:40+5:30

आईच्या (अवनी) हत्येनंतर अनाथ झालेल्या दोन बछड्यांची चिंता आता मिटली आहे. त्याला कारणही तसेच आहे. हे दोनही बछडे आता शिकार करायला लागल्याने वनविभागाने सुटकेचा श्वास सोडला आहे.

Avni's calf is ready for hunting | अवनीचे बछडे शिकारीसाठी सज्ज

अवनीचे बछडे शिकारीसाठी सज्ज

Next
ठळक मुद्देचिंता मिटली : वाघासह बछड्यांना इतरत्र हलविणार, वनविभागाचा ‘वॉच’

संतोष कुंडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : आईच्या (अवनी) हत्येनंतर अनाथ झालेल्या दोन बछड्यांची चिंता आता मिटली आहे. त्याला कारणही तसेच आहे. हे दोनही बछडे आता शिकार करायला लागल्याने वनविभागाने सुटकेचा श्वास सोडला आहे. पित्याच्या तालमीत या बछड्यांनी शिकारीचे प्रशिक्षण घेतले, असे वनविभागाचे अधिकारी सांगतात.
१३ जणांच्या बळी घेणाऱ्या अवनी वाघिणीला २ नोव्हेंबरच्या रात्री गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. ही वाघीण दोन बछड्यांसह राळेगाव तालुक्यातील बोराटीच्या जंगलात वास्तव्याला होती. यादरम्यान नर वाघदेखिल तिच्यासोबत होता. दोन वर्षांत १३ जणांवर हल्ले करून ठार मारणाºया अवनीची पंचक्रोशीत दहशत पसरली होती. यामुळे ट्रॅन्क्युलाईज करून तिला पकडा अथवा वेळप्रसंगी ठार मारा, असे आदेशच न्यायालयाने दिले होते. मात्र वन्यजीवप्रेमींचा याला विरोध होता. वनविभागाचे २०० च्यावर अधिकारी व कर्मचारी बोराटीच्या जंगलात रात्रंदिवस अवनीचा शोध घेत होते. अखेर २ नोव्हेंबरच्या रात्री अवनी वनविभागाच्या पथकाच्या टप्प्यात आली आणि शार्पशुटर शहाफत अली खान याचा मुलगा अजगर अली याने अवनीला गोळ्या घातल्या.
या घटनेनंतर अवनीच्या बछड्यांचे काय, असा प्रश्न वन्यजीव प्रेमींसह सर्वांनाच छळू लागला. वयाने लहान असल्याने हे बछडे शिकारही करू शकत नव्हते. त्यामुळे वनविभागाने या बछड्यांना पकडण्याची दुसरी मोहिम हाती घेतली. दोघांनाही ट्रँन्क्युलाईज करून सुरक्षित पकडण्याचे प्रयत्न अद्यापही सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता दोन बछड्यांसह नर वाघालाही ट्रँन्क्युलाईज करून अन्य जंगलात सोडण्याचा प्लॅन वनविभागाने आखला आहे.
त्यासाठी वनविभागाचे पथक बोराटीच्या जंगलात डोळ्यात तेल घालून पहारा देत आहे. ज्या परिसरात हे बछडे फिरत आहे, त्या परिसराला कंपाउंड करून बछडे व नर वाघाला पकडण्याचा प्रयत्न या पथकाकडून केला जात आहे. बछड्यांचे पगमार्क याच भागात आढळत असल्याने त्याचठिकाणी असल्याची खात्री वनविभागाला आहे.
पितृत्वाच्या तालमीत शिकारीचे धडे
अवनी वाघिण जीवंत असताना बछडे लहान असल्याने ती स्वत: शिकार करून आपल्या बछड्यांची भूक भागवित होती. आईच्या सावलीत वाढत असलेल्या बछड्यांना मात्र काही काळातच अनाथ व्हावे लागले. अवनीला ठार मारल्यानंतर नर वाघाने मात्र बछड्यांची साथ सोडली नाही. तो सावली बनून या बछड्यांच्या सोबत अजुनही भटकत आहे. भूकेने व्याकुळ होऊन बछड्यांचा मृत्यू होऊ नये म्हणून वनविभागाने डुकरांचे छोटे पिल्लंदेखिल त्या भागात सोडले. बछडे मात्र पित्याच्या तालमीत शिकारीचे धडे गिरवत होते. शिकारीत पारंगत होऊन हे बछडे अलिकडे आता स्वत:च शिकार करीत असल्याची माहिती एका जाणकार वन्यजीवप्रेमीने ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. असे असले तरी भविष्यात हे बछडे मोठे होऊन पुन्हा वाघ मानव संघर्ष पेटू नये, यासाठी बछडे व नर वाघाला ट्रँन्क्युलाईज करून पकडण्याच्या मोहिमेला वनविभागाने वेग दिला आहे.

Web Title: Avni's calf is ready for hunting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.