पुसद तालुक्यात लसीकरणाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:29 AM2021-06-03T04:29:32+5:302021-06-03T04:29:32+5:30
पुसद : तालुक्यात लसीकरणाबाबत जनजागृती माहीम राबविली जात आहे. या मोहिमेसाठी तिन्ही आमदारांनी पुढाकार घेतला आहे. या मोहिमेत पिंपळखुटा ...
पुसद : तालुक्यात लसीकरणाबाबत जनजागृती माहीम राबविली जात आहे. या मोहिमेसाठी तिन्ही आमदारांनी पुढाकार घेतला आहे.
या मोहिमेत पिंपळखुटा येथील शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद
लाभला. आमदार इंद्रनील नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा आणि आमदार ॲड. नीलय नाईक आदींच्या पुढाकाराने तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तालुक्यातील पिंपळखुटा ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित लसीकरण शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पिंपळखुटा ग्रामपंचायतीने लसीकरण शिबिर घेतले. त्यात आमदार त्रयींनी एकत्र येत नागरिकांना कोरोना आजाराचे गांभीर्य कथन केले. कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. नियमितपणे हात धुणे, मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे आदींबाबत मार्गदर्शन केले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यशस्वीतेसाठी सरपंच रणवीर टाले, उपसरपंच पंडित राठोड, सचिव विक्रांत बरोडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल चव्हाण, डॉ. पंकज शेळके, डॉ. रणजित गोरमाडे,
आरोग्य सेवक नत्थू राठोड, हेमंत काळे, रवी भराळे, आरोग्य सेविका ताई दशरथकर, ताई भोयर,
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शिबिरात तब्बल १२० गावकऱ्यांचे लसीकरण करण्यात आले.