आर्णी येथे बाबा कंबलपोष यात्रा महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 10:14 PM2018-01-31T22:14:03+5:302018-01-31T22:14:20+5:30
सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या येथील बाबा कंबलपोष यात्रा महोत्सवाचे आयोजन ५ ते १० फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या येथील बाबा कंबलपोष यात्रा महोत्सवाचे आयोजन ५ ते १० फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
आर्णी येथील अरुणावती नदीच्या तीरावर बाबा कंबलपोष यात्रा दरवर्षी भरविली जाते. या ठिकाणी सर्वधर्मिय नागरिक नतमस्तक होतात. शमशूल आरेफीन शिरजुल हजरत सैयदाना अशशाह अलहाज अब्दुल रहेमान किबला कादरी हजरत अर्थात बाबा कंबलपोष व बच्चूबाबा यांच्या स्मरणार्थ ही यात्रा भरविली जाते. ५ फेब्रुवारीला यात्रा महोत्सवाला प्रारंभ होत असून दुपारी ३ वाजता संदल ठाणेदार नंदकिशोर पंत यांच्या बंगल्यावरून निघेल. ६ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता चाँद कादरी यांची कव्वाली, ७ फेब्रुवारीला गुलाम साबीर व गुलाम वारीस यांची कव्वाली, ८ फेब्रुवारीला भव्य खंजिरी भजन स्पर्धा, ९ फेब्रुवारीला हास्य सम्राट सिद्धार्थ खिल्लारे व सारेगामा फेम अंजली गायकवाड यांचा कार्यक्रम तर १० फेब्रुवारीला सारेगामापा लिटील चॅम्प विनर अजमत हुसेन जबलपूर यांचा कार्यक्रम होणार आहे. ५ ते १० फेब्रुवारीपर्यंत दररोज लंगर, विनामूल्य रोगनिदान शिबिर आयोजित आहे. शिबिरात डॉ.राजेश पवार, डॉ.मनीष राठोड, डॉ.अरुण वाघ, डॉ.विक्रम ठवकर, डॉ.संजय माळवी, डॉ.अमृता पुनसे, डॉ.योगेश मोतेवार, डॉ.पाशू शेख, डॉ.अनिल पटेल, डॉ.अमर सुरजुसे, डॉ.अनिकेत भडके, डॉ.संगीता चव्हाण, डॉ.नितीन खडसिंगे रुग्णांची तपासणी करणार आहे.
यशस्वीतेसाठी कमिटीचे अध्यक्ष आमदार ख्वाजा बेग, उपाध्यक्ष दत्तूसिंग चंदेल, सचिव रियाज बेग, अ.मुजीब शेख, हाजी जिकरूल्ला खान, सुनील झुनझुनवाला, मो.इरफान शेख परिश्रम घेत आहे. ठाणेदार नंदकिशोर पंत यात्रेदरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवणार आहे.