वैष्णव चतु: संप्रदायाच्या अध्यक्षपदी बाबा सांवरिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 05:00 AM2020-12-06T05:00:00+5:302020-12-06T05:00:02+5:30
देशभरातून आलेले संत, महंत, महामंडलेश्वर यांच्या उपस्थितीत अभिषेक पार पडला. तत्पूर्वी सतीधाम लकडगंज येथून शोभायात्रा निघाली. भाविकांनी चाैकाचाैकात शोभायात्रेचे स्वागत केले. यानंतर बालाजी मंदिर परिसरातील मैदानात कार्यक्रम पार पडला. बाबा रामलखनदास यांनी ज्या चार संप्रदायाचे एकत्रिकरण केले, त्या चतु: संप्रदायाचेही बाबा सांवरिया अध्यक्ष झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अखिल भारतीय वैष्णव चतु: संप्रदायाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि निर्मोही आखाड्याचे प्रमुख महंत दिवंगत रामलखनदास बाबा यांचे उत्तराधिकारी म्हणून महामंडलेश्वर भागवत कथेचे मर्मज्ञ वृंदावननिवासी कृष्णदास सांवरिया बाबा यांचा अभिषेक झाला. येथील बालाजी चाैकातील बालाजी मंदिर परिसरातील मैदानात शनिवारी विधीपूर्वक गुरुपूजन सोहळा झाल्यावर बाबा सांवरिया यांची अ.भा. विष्णूस्वामी वैष्णव संप्रदाय आणि निर्मोही आखाड्याच्या गादीवर नियुक्ती झाली.
देशभरातून आलेले संत, महंत, महामंडलेश्वर यांच्या उपस्थितीत अभिषेक पार पडला. तत्पूर्वी सतीधाम लकडगंज येथून शोभायात्रा निघाली. भाविकांनी चाैकाचाैकात शोभायात्रेचे स्वागत केले. यानंतर बालाजी मंदिर परिसरातील मैदानात कार्यक्रम पार पडला. बाबा रामलखनदास यांनी ज्या चार संप्रदायाचे एकत्रिकरण केले, त्या चतु: संप्रदायाचेही बाबा सांवरिया अध्यक्ष झाले आहेत. जगद्गुरू राजराजेश्वर यांनी मनोगत करून सांवरिया बाबा यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले. याप्रसंगी उपस्थित महंत फुलडोलदास, महंत बर्फानीदास, महंत रासबिहारी हे तीन वेगवेगळ्या संप्रदायाचे महंत आहेत. चाैथ्या विष्णूशास्त्री संप्रदायाच्या महंतपदी सांवरिया नियुक्त झाले आहेत. यावेळी पंच निर्वाणी आखाड्याचे अध्यक्ष महंत धर्मदास महाराज, पंच दिगंबरी आखाड्याचे महंत रामकिसनदास महाराज, महंत रामकिशोरदास महाराज, जगद्गुरू वल्लभाचार्य महाराज, जगद्गुरू डाॅ. रामकमल वेदांती महाराज, रामजीदास महाराज, गाैरीशंकरदास, महंत नरेंद्रदास महाराज आणि विष्णूशास्त्री आखाड्याचे अध्यक्ष महंत विजेंद्रदास उपस्थित होते.