वाचन करून बाबासाहेबांना अभिवादन
By admin | Published: April 16, 2016 01:57 AM2016-04-16T01:57:15+5:302016-04-16T01:57:15+5:30
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी होत असतानाच आर्णी येथेही ....
चिमुकल्यांचा उपक्रम : आर्णी येथे आगळीवेगळी जयंती साजरी
आर्णी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी होत असतानाच आर्णी येथेही चिमुकल्यांनी सातत्यपूर्ण वाचन करून बाबासाहेबांना आगळीवेगळे अभिवादन केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
आर्णी येथील प्रणया बागूल या मुलीने आपल्या परिसरातील सर्व चिमुकल्यांना एकत्र करून डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या वाचनाच्या आवडीबाबत माहिती दिली. तसेच सर्वांनी वाचन करून बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये रत्ना वानखडे, नेहा वानखडे, गौरी पोहेकर, सृष्टी मानकर, आदित्य राठोड, तुषार राठोड, निधी राठोड, शंतनू पोहेकर, रोहित दाभाडकर, कृष्णा मानकर, गौरी शिवणकर, कल्याणी शिवणकर आदींनी सहभाग घेतला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. (शहर प्रतिनिधी)