बसवेश्वरांचा महिला स्वातंत्र्यासाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 10:26 PM2018-04-21T22:26:13+5:302018-04-21T22:26:13+5:30

महात्मा बसवेश्वर हे थोर समाज सुधारक होते. त्यांनी १२ व्या शतकात अस्पृश्यता निर्मूलनाने कार्य करून लोकशाहीची मूल्ये रूजविली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, अहिंसा आदी विचारांसह महात्मा बसवेश्वरांनी महिलांच्या स्वातंत्र्यासाठीही संघर्ष केला.

Bacheshwar women struggle for independence | बसवेश्वरांचा महिला स्वातंत्र्यासाठी संघर्ष

बसवेश्वरांचा महिला स्वातंत्र्यासाठी संघर्ष

googlenewsNext
ठळक मुद्देभीमराव पाटील : पुसदमध्ये लिंगायत समाजातर्फे व्याख्यानाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : महात्मा बसवेश्वर हे थोर समाज सुधारक होते. त्यांनी १२ व्या शतकात अस्पृश्यता निर्मूलनाने कार्य करून लोकशाहीची मूल्ये रूजविली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, अहिंसा आदी विचारांसह महात्मा बसवेश्वरांनी महिलांच्या स्वातंत्र्यासाठीही संघर्ष केला. या विचारांचा वारसदार लिंगायत समाज असल्याचे प्रतिपादन लातूर येथील प्रा.डॉ.भीमराव पाटील यांनी केले.
समाज सुधारणेचे अग्रणी महात्मा बसवेश्वर यांच्या ९१३ व्या जयंतीनिमित्त येथील वीरशैव लिंगायत समाजातर्फे स्थानिक लिंगायत मठात आयोजित व्याख्यानाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी विदर्भरत्न पुरस्कार प्राप्त राजन मुखरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरचे विदर्भ लिंगायत समाजाचे अध्यक्ष शिरीष रामापूरे, ठाणेदार अनिलसिंह गौतम, वीरशैव लिंगायत समाज पुसदचे अध्यक्ष संतोष तडकसे उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी लिंगायत समाजातील दिवाणी न्यायाधीश उदय प्रकाश हिंगमीरे, योगाचार्य शुभांगी खके, फुटबॉलपटू समृद्धी बिडवई, बालकवयित्री समृद्धी डांगे, एमबीबीएस प्रवेशपात्र ऋतुजा तडकसे, कृष्णा व्यंकटवार, शैलेश आजेगावकर, उन्नती खके, सुशील व संध्या रोहडकर, गजानन व सुरेश मोगरे, निर्मलाबाई देऊळकर, राजन मुखरे आदींचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
प्रारंभी लिंगायत समाजातील शहीद जवान शुभम मुस्तापूरे परभणी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी शिरीष रामापूरे यांनी लिंगायत समाज स्मशानभूमी सौंदर्यीकरणासाठी ३१ हजार रुपयांचा धनादेश दिला. संचालन राणी लकडे व निशा डांगे, तर आभार सुयोग लकडे यांनी मानले. यावेळी पुसद चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष सूरज डुबेवार, प्रवीण व्यवहारे, रवी पद्मावार, सुशांत महल्ले, संगमनाथ सोमावार, प्रा. महाजन, विनय ठोंबरे, प्रकाश हिंगमीरे, सुशील रोहडकर, रणवीर पाटील, संजय बजाज, प्रा.प्रकाश लामणे, वरदा टाले, क्रांती भवानकर, प्रतिभा पांडे, अश्विनी तडकसे, दीपा पांडे, संगीता चाकोते, स्मिता पांडे, ताई ठोंबरे, स्नेहल खाकरे, राजश्री शिवणकर, मिनल देऊळकर आदी उपस्थित होते.

Web Title: Bacheshwar women struggle for independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.