७८ हजार शेतकऱ्यांची रबी पीक विम्याकडे पाठ

By admin | Published: January 3, 2016 03:04 AM2016-01-03T03:04:58+5:302016-01-03T03:04:58+5:30

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका कधीही बसू शकतो याची जाणीव असतानाही जिल्ह्यातील तब्बल ७८ हजार शेतकऱ्यांनी रबी पीक विम्याकडे पाठ फिरविली आहे.

Back to 78,000 farmers Rabi crop insurance | ७८ हजार शेतकऱ्यांची रबी पीक विम्याकडे पाठ

७८ हजार शेतकऱ्यांची रबी पीक विम्याकडे पाठ

Next

माहितीच पोहोचली नाही : कृषी विभागाचे दुर्लक्ष
यवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका कधीही बसू शकतो याची जाणीव असतानाही जिल्ह्यातील तब्बल ७८ हजार शेतकऱ्यांनी रबी पीक विम्याकडे पाठ फिरविली आहे. त्याचे कारणही तसेच आहे, बहुतांश शेतकऱ्यांंना या योजनेची माहितीच कृषी विभागामार्फत पोहोचली नाही. परिणामी रबी हंगामात गारपीट झालीच तर या शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळणार नाही.
यवतमाळ जिल्ह्यात रबी हंगामात एक लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गहू, हरभरा आणि इतर पिकांचा समावेश आहे. निसर्गाच्या अवकृपेत शेतकऱ्यांना सावरता यावे म्हणून पीक विमा योजना रबी हंगामासाठीही लागू करण्यात आली आहे. परंतु या पीक विम्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात कृषी विभाग अपयशी ठरल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील केवळ २३ हजार शेतकऱ्यांनीच अंतिम मुदतीपर्यंत पीक विमा उतरविला. तर तब्बल ७८ हजार शेतकरी या पीक विम्यापासून अनभिज्ञ राहिले. विशेष म्हणजे या पीक विम्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कृषी सहायकांवर सोपविण्यात आली होती. परंतु त्यांनी शेतकऱ्यांना ही माहिती दिली नसल्याचा आरोप होत आहे. काही शेतकऱ्यांंना अंतिम मुदत असलेल्या ३१ डिसेंबर रोजी माहिती मिळाली. त्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात वेळ निघून गेला. (शहर वार्ताहर)

Web Title: Back to 78,000 farmers Rabi crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.