परतीच्या पावसाचा पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 11:23 PM2017-10-14T23:23:13+5:302017-10-14T23:23:30+5:30
महागाव तालुक्यातील बिजोरा परिसरात गत आठवड्यापासून पडत असलेल्या परतीच्या पावसाचा पिकांना फटका बसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बिजोरा : महागाव तालुक्यातील बिजोरा परिसरात गत आठवड्यापासून पडत असलेल्या परतीच्या पावसाचा पिकांना फटका बसत आहे. काही शेतात कपाशीच्या बोंडाला कोंब फुटल्याचे दिसत आहे. यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.
सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली होती. अशा परिस्थितीत शेतकºयांनी परिश्रमातून पीक जगविले. आता कपाशीला बोंडे आली असून कापूस फुटत आहे. अशा परिस्थितीत गत आठवड्यापासून बिजोरा परिसरात परतीचा पाऊस सुरू आहे. यामुळे कपाशी पीक ओले होत आहे. अनेक शेतात कपाशीच्या बोंडाला कोंब फुटल्याचे दिसत आहे. यामुळे मोठे नुकसान होत आहे. कापून ठेवलेला सोयाबीन झाकताना त्रेधा उडत आहे. कृषी विभागाने शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
सोयाबीनचेही नुकसान
महागाव तालुक्यात कपाशीसोबतच सोयाबीनलाही परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकºयांनी सोयाबीन सोंगणी करून ठेवले आहे. मात्र मजूर मिळत नसल्याने त्याची काढणी रखडली होती. दरम्यान, पाऊस आल्याने सोयाबीन ओला झाला. यात शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.