पुसद येथे बहुजन क्रांती मोर्चाचा हुंकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 09:40 PM2018-02-08T21:40:35+5:302018-02-08T21:41:25+5:30

कोरेगाव भीमा द्विशताब्दी क्रांती स्मृतिदिन समापन वर्षानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर भ्याड हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना अटक करावी या प्रमुख मागणीसाठी शहरात बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने शहरात रॅली काढण्यात आली होती.

 Bahujan Kranti Morcha's hunker at Pusad | पुसद येथे बहुजन क्रांती मोर्चाचा हुंकार

पुसद येथे बहुजन क्रांती मोर्चाचा हुंकार

googlenewsNext
ठळक मुद्देबहुजन क्रांती मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : कोरेगाव भीमा द्विशताब्दी क्रांती स्मृतिदिन समापन वर्षानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर भ्याड हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना अटक करावी या प्रमुख मागणीसाठी शहरात बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने शहरात रॅली काढण्यात आली होती. यावेळी निवेदन एसडीओंना देण्यात आले.
येथील तीन पुतळा मैदानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला माल्यार्पण करुन मोर्चाला प्रारंभ झाला. सुभाष चौक, डॉ. आंबेडकर चौक, गांधी चौक असे मार्गक्रमण करीत रॅली तहसीलवर धडकली. या रॅलीत विविध रंगाचे झेंडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसीलसमोर झालेल्या सभेत राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे गणपत गव्हाळे, ज्ञानदीप कांबळे, राजेश शिरसाट, तहसीन खान, अर्चना खंदारे यांनी विचार मांडले.
या यशस्वीतेसाठी सै. सद्दीकोद्दीन, माधव हाटे, संजय मनवर, दिनेश खांडेकर, बेबी कांबळे, विद्या मांडवकर, पौर्णिमा हनवते, आशा गव्हाळे, वर्षा सुरवाडे, वैशाली कांबळे यांनी परिश्रम घेतले.

Web Title:  Bahujan Kranti Morcha's hunker at Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.