१५ व्या वित्त आयोगातील सात कोटी रुपये शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:46 AM2021-08-24T04:46:14+5:302021-08-24T04:46:14+5:30
संजय भगत महागाव : ग्रामीण विकासाचा पाया असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांचा प्रचंड अनुशेष वाढला आहे. परिणामी विविध योजनेचा निधी खर्च ...
संजय भगत
महागाव : ग्रामीण विकासाचा पाया असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांचा प्रचंड अनुशेष वाढला आहे. परिणामी विविध योजनेचा निधी खर्च न होता तसाच पडून आहे. १५ व्या वित्त आयोगातील तब्बल सात कोटी रुपयांचा निधी अखर्चित पडून आहे.
तालुक्यात नवीन सरपंच, सदस्यांचा कार्यकाळ सुरू झाला आहे. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने ग्रामपंचायतीच्या मासिक सभा आणि खर्चाचे नियोजन पूर्ण ठप्प पडलेले आहे. तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींत मे २०२१ मध्ये नवीन सरपंच, सदस्य पदारूढ झाले. तेव्हापासून १५ व्या वित्त आयोगातील व अन्य मार्गाने आलेला विकास निधी खर्च करण्यात आला नाही.
मुडाणा, फुलसावंगी, हिवरा, सवना अशा मोठ्या ग्रामपंचायतींना ५० लाख रुपये येऊन पडले आहे. मात्र, खर्चाबाबत नवीन सरपंच, सदस्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. उलट सचिवांची वानवा आहे. आधीच प्रचंड अनुशेष असताना नुकतीच ११ ग्रामसेवकांची इतरत्र बदली करण्यात आली. त्या बदल्यात केवळ सात ग्रामसेवक देण्यात आले. ते अद्याप रुजू झाले नाही. त्यामुळे अनुशेषामध्ये वाढ झाली आहे.
बॉक्स
१५ काेटींचा निधी अखर्चित
तालुक्यातील पोखरी, वाकान, कोनदरी, इजणी येथील विविध कामांवर साधारणत अडीच ते तीन लाख रुपये खर्च झाले. १५ व्या वित्त आयोगातील अगोदरच निधी शिल्लक असताना आता दुसरा हप्ता येऊन पडला. त्यामुळे तालुक्यात किमान पंधरा कोटींच्या जवळपास निधी अखर्चित पडून आहे.