बळीराजा चेतना अभियानाचे जिल्हा पुरस्कार जाहीर

By admin | Published: April 16, 2017 01:05 AM2017-04-16T01:05:29+5:302017-04-16T01:05:29+5:30

शासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या बळीराजा चेतना अभियानाचे जिल्हास्तरीय पुरस्कार घोषित झाले असून या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र दिनी १ मे रोजी होणार आहे.

Baliaraja Chetana campaign district award is announced | बळीराजा चेतना अभियानाचे जिल्हा पुरस्कार जाहीर

बळीराजा चेतना अभियानाचे जिल्हा पुरस्कार जाहीर

Next

महाराष्ट्र दिनी वितरण : पालकमंत्र्यांची घोषणा, शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी लिखाण
यवतमाळ : शासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या बळीराजा चेतना अभियानाचे जिल्हास्तरीय पुरस्कार घोषित झाले असून या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र दिनी १ मे रोजी होणार आहे.
बळीराजा चेतना अभियानाच्या जिल्हास्तरीय पुरस्काराची घोषणा पालकमंत्री मदन येरावार यांनी केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सदर पुरस्कार घोषित करण्यात आले. यशोगाथा सांगणारे, घडविणारे शेतकरी या घटकातील प्रथम पुरस्कार माणिक बाबाराव कदम (कळंब), द्वितीय अशोक वानखडे (उमरखेड) आणि तृतीय पुरस्कार केशव तुकाराम निमकर (कोठा ता.कळंब) यांना जाहीर करण्यात आला. प्रवचनकार, नाटककार, गायक, पथनाट्य, कीर्तनकार, व्याख्याते, रांगोळीकार, कृषी मेळावे या घटकातील प्रथम पुरस्कार दत्तात्रय देवराव मारकड महाराज (आर्णी), द्वितीय पंकज खंडूसिंग राठोड (वाशीम), नागोराव भूजंगराव मुळे महाराज (उमरखेड) यांना विभागातून तर तृतीय पुरस्कार गंगाधर घोटेकर (राळेगाव) यांना जाहीर झाला.
वृत्तपत्रे नियतकालिकातून लिखाण करणारे, वृत्तपत्राचे स्तंभ लेखन या घटकातील प्रथम पुरस्कार दैनिक लोकमतचे उपसंपादक सुहास सुपासे आणि दिव्य मराठीचे जिल्हा प्रतिनिधी अमोल ढोणे यांना विभागून देण्यात आला. द्वितीय पुरस्कार देशोन्नतीचे उपसंपादक संतोष पुरी आणि टाईम्स आॅफ इंडियाचे जिल्हा प्रतिनिधी टी.ओ. अब्राहम यांना विभागून तर तृतीय पुरस्कार सकाळचे तालुका प्रतिनिधी शब्बीर खान आणि एबीपी माझा वृत्त वाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी कपिल देवचंद श्यामकुंवर यांना विभागून जाहीर करण्यात आला. सामाजिक, सांस्कृतिक घटकातील प्रथम पुरस्कार राळेगाव येथील गुरूदेव सेवा मंडळ (अध्यक्ष-ज्ञानेश्वर मुडे) या संस्थेला तर द्वितीय स्वर जीवन सांस्कृतिक कला व बहुद्देशीय संस्था घाटंजी (अध्यक्ष-प्रफुल्ल राऊत) तर तृतीय पुरस्कार प्रीती ग्रामीण विकास संस्था (अध्यक्ष-भीमराव महाराज) यांना जाहीर करण्यात आला. उत्कृष्ट काम करणाऱ्या शासकीय घटकातील प्रथम पुरस्कार तलाठी श्याम रणनवरे (आर्णी) यांना देण्यात येणार आहे.
समस्यांच्या अनुषंगाने निराकरण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते लोकसेवक पंचायत राज संस्थेचे सदस्य या घटकातील प्रथम पुरस्कार डॉ.प्रवीण अ. गिरी (यवतमाळ), द्वितीय विशाल खांदणकर (वणी) तर तृतीय ग्रामस्तरीय समिती (शेंबाळपिंपरी) यांना जाहीर करण्यात आला. पुरस्कारांची घोषणा करण्यात आली त्यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

‘लोकमत’चे सुहास सुपासे यांना प्रथम पुरस्कार
बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत उत्कृष्ट लिखाणासाठी दिला जाणारा पुरस्कार लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालयातील उपसंपादक सुहास कालिदास सुपासे यांना जाहीर झाला आहे. सुपासे यांनी बळीराजा चेतना अभियानांतर्गत विकासात्मक लेखण करून शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या लिखाणाची दखल घेत त्यांना प्रथम पुरस्कार घोषित केला.

Web Title: Baliaraja Chetana campaign district award is announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.