सनातन संस्थेवर बंदी घाला

By admin | Published: October 16, 2015 02:23 AM2015-10-16T02:23:57+5:302015-10-16T02:23:57+5:30

सनातन प्रभात या संस्थेवर बंदी घाला, अशा मागणीचे निवेदन बुधवारी भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Ban Sanatan Sanstha | सनातन संस्थेवर बंदी घाला

सनातन संस्थेवर बंदी घाला

Next

निवेदन : भारिप-बहुजन महासंघाची मागणी
यवतमाळ : सनातन प्रभात या संस्थेवर बंदी घाला, अशा मागणीचे निवेदन बुधवारी भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
या संस्थेवर गोविंद पानसरेंसह इतर समाजसुधारकांच्या हत्येचा आरोप असून नुकतीच त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांनाही धमकी दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. सनातनचा साधक समीर गायकवाड याला पोलिसांनी अटक केली असून अशाप्रकारच्या अनेक गुन्ह्यात त्याचा सहभाग पोलीस तपासात उघड होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणा देत निदर्शने केली. निवेदन देताना भारिप बहुजन महासंघाचे शीतल सिरसाट, संजय बोरकर, ज्ञानेश्वर गोबरे, विठ्ठल नाकतोडे, एम. के. कोडापे, धनंजय गायकवाड, एन. टी. सिरसाट, के.डी. भगत, अजय खंडारे, भारती सावटे, पुष्पा सिरसाट, अरुण शरदकर, बाबुराव सावटे, के.एस.नाईक, नारायण थूल आदींसह अनेकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Ban Sanatan Sanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.