बांगरनगरात दगडाने ठेचून तरुणाचा खून

By admin | Published: August 10, 2016 01:08 AM2016-08-10T01:08:16+5:302016-08-10T01:08:16+5:30

लहान मुलांना मारहाण करून त्रस्त करणाऱ्या एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना

Bangarnagar stone crushed youth's blood | बांगरनगरात दगडाने ठेचून तरुणाचा खून

बांगरनगरात दगडाने ठेचून तरुणाचा खून

Next

मारहाणीचा वचपा : तीन अल्पवयीनांना केली अटक
यवतमाळ : लहान मुलांना मारहाण करून त्रस्त करणाऱ्या एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना येथील बांगरनगर परिसरातील पेट्रोल पंपासमोर सोमवारी रात्री १०.३० वाजता सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांनी खुनाची कबुली पोलिसांपुढे दिल्याची माहिती आहे.
अक्षय अजय रामटेके (२२) रा. पाटीपूरा असे मृताचे नाव आहे. अक्षय हा कोणत्याही कारणावरून या प्रकरणात ताब्यात असलेल्या बालकांना सतत मारहाण करत होता. सोमवारी अक्षयने दोन हजार रुपये घेऊन एका मुलाला बोलावले होते. अक्षय दोन महिन्यापासून या तिघांकडून मारहाण करून पैसे घेत होता. कधी तोंडावर ठोसा मार तर कधी छातीवर यामुळे तीघेही जण धास्तावले होते. सोमवारी अक्षयला देण्यासाठी आठशे रूपये घेऊन हे तिघे गेले होते. त्याने पैसे घेण्यास नकार देत एकाच्या हातावर चाकू मारला. त्यावेळी अक्षयच्या हातातील चाकू हिसकावून त्याच्या मानेवर वार केला तसेच दगडाने ठेचून मारहाण केली. या घटनेने बांगरनगर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपींचा शोध सुरू झाला. मारेकऱ्यांनी वडगाव येथील मोक्षधामात आश्रय घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रात्री १ वाजता अटक केली. ही कारवाई अ‍ॅन्टीगँग सेलच्या पथकाने केली. खूनाच्या घटनेनंतर पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी घटनास्थळाला भेट दिली. तीनही विधीसंघर्षग्रस्त बालक भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. तर एक जण अकरावीत आहे. या प्रकरणी विजय भीमराव धुळे रा. अशोकनगर याने आपल्या तक्रारीत भांडणाचा वचपा काढण्यासाठी अक्षयला बोलावून त्याचा खून केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Bangarnagar stone crushed youth's blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.