दारव्हा येथे बंजारा समाजाचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 09:36 PM2017-12-21T21:36:12+5:302017-12-21T21:36:43+5:30
तेलंगणा, महाराष्ट्र सीमेवरील बंजारा समाज बांधवांवर प्राणघातक हल्ले आणि अमानुष हत्या होत आहे. तेथील लोकांना तत्काळ सुरक्षा मिळावी, घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला योग्य मोबदला मिळावा, .....
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : तेलंगणा, महाराष्ट्र सीमेवरील बंजारा समाज बांधवांवर प्राणघातक हल्ले आणि अमानुष हत्या होत आहे. तेथील लोकांना तत्काळ सुरक्षा मिळावी, घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला योग्य मोबदला मिळावा, हल्लेखोरांना कठोर शासन व्हावे याकरिता सदर प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी गोर बंजारा समाज कृती समितीने केली आहे.
समाजाच्यावतीने येथील उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाºयांना देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रेमनगर व परमडोळी तांड्यातील रहिवासी बंजारा समाजबांधवांना आरक्षणाच्या मुद्यावरून टार्गेट केले जात आहे. ४०० ते ५०० च्या जमावाने हल्ला केल्यानंतर सात ते आठ जणांचा जीव गेला. अनेकजण जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी येथे गोर बंजारा समाज कृती समितीच्यावतीने शिवाजीनगरातील हनुमान संस्थानजवळून मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडकला. याठिकाणी काही मान्यवरांनी मार्गदर्शन केले. निवेदन उपविभागीय अधिकाºयांना सादर केले. निवेदनावर कृती समितीचे अध्यक्ष सुशील राठोड, उपाध्यक्ष डॉ.मनोज राठोड, सचिव शंंकर राठोड यासह समाधान आडे, रमेश राठोड, भारत जाधव, दिलीप नाईक, गणेश जाधव, गजेंद्र चव्हाण, माणिक राठोड, प्रेम राठोड, नारायण राठोड, शेषराव राठोड आदींची स्वाक्षरी आहे.