पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:57 AM2017-07-21T01:57:03+5:302017-07-21T01:57:03+5:30

पोटच्या मुलीवर लैैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यास पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश

Bapu's lifelong resentment against the abdomen's daughter | पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास जन्मठेप

पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास जन्मठेप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : पोटच्या मुलीवर लैैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यास पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एन.जोशी यांनी गुरूवारी जन्मठेपेचे शिक्षा सुनावली.
आरोपी पिता हा मारेगाव येथील रहिवासी आहे. ८ जून २०१५ रोजी घरी कुणी नसताना रात्री १२ ते १ वाजताच्या सुमारास त्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. आई बाहेरगावी असल्याने दुसऱ्या दिवशी तिने फोन करून सर्व प्रकार सांगितला. मात्र बदनामी नको म्हणून तक्रार करण्यात आली नाही. त्यानंतर ६ जुलै २०१५ रोजी दुपारी १२ वाजताच्या पित्याने पुन्हा अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र ती बाहेर पळून गेली आणि तेथून आईला माहिती दिली. अखेर आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासाअंती प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले.
या प्रकरणाचा खटला पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू होता. या खटल्यात एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्याचा निकाल गुरूवारी जाहीर करण्यात आला. सदर प्रकरणात सरकारच्यावतीने अ‍ॅड.प्रशांत मानकर यांनी बाजू मांडली.

Web Title: Bapu's lifelong resentment against the abdomen's daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.