संभाव्य टोळधाड रोखण्यासाठी सतर्क रहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 05:00 AM2020-06-03T05:00:00+5:302020-06-03T05:00:35+5:30
या टोळधाडीचे थवे ताशी १२ ते १६ कि.मी. इतक्या वेगाने उडतात. या टोळ किडीचे थवे दूरवर उडून जात असल्याने अशा टोळधाडीपासून धोका असतो. ही किड तिच्या मार्गातील वनस्पतीची हिरवी पाने, ुफुले, फळे, बिया, फांदी, पालवी आदींचा फडशा पाडतात. वाळवंटी टोळ ही नाकतोड्याच्या गटातील टोळ आपल्याकडे आढळतात. वाळवंटी टोळ ही तांबूस रंगाची असते. ही अत्यंत खादाड व नुकसान करणारी कीड आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गुजरात, राजस्थान व मध्यप्रदेशात टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात या टोळधाडीचा प्रवेश झाला नसला तरी संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतक-यांना सतर्क राहून या टोळाधाडीचे नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
या टोळधाडीचे थवे ताशी १२ ते १६ कि.मी. इतक्या वेगाने उडतात. या टोळ किडीचे थवे दूरवर उडून जात असल्याने अशा टोळधाडीपासून धोका असतो. ही किड तिच्या मार्गातील वनस्पतीची हिरवी पाने, ुफुले, फळे, बिया, फांदी, पालवी आदींचा फडशा पाडतात. वाळवंटी टोळ ही नाकतोड्याच्या गटातील टोळ आपल्याकडे आढळतात. वाळवंटी टोळ ही तांबूस रंगाची असते. ही अत्यंत खादाड व नुकसान करणारी कीड आहे. एका टोळधाडीत असंख्य टोळ असतात. टोळामध्ये दोन प्रकारच्या स्थिती असतात. जेव्हा टोळांची संख्या खूपच कमी व विरळ असते तेव्हा त्या स्थितीत एकाकी स्थिती म्हणतात. अनुकूल हवामानात टोळांची संख्या खूप वाढते, त्याचे थवे तयार होतात व त्यांना भ्रमण करावेसे वाटते. हे थवे पुढे सरकत असतांना सायंकाळ झाल्यावर झाडा - झुडपामध्ये वस्तीत राहतात. पूर्ण वाढलेले थव्याचे स्थितीतील प्रौढ टोळ तांबूस रंगाचे असतात. एक चौरस किमी क्षेत्रावर जर टोळधाड असेल तर त्यामध्ये जवळ जवळ ३ हजार क्विंटल टोळ असतात. बाल्यावस्थेतील पिल्ले त्यांच्या वजनापेक्षा ६ ते ८ पटीने जास्त अन्न खातात. तांबूस टोळ पूर्णावस्थेत पोहचल्यावर पिवळ्या रंगाचे होतात. टोळधाडीने अद्यापपर्यंत यवतमाळ जिल्ह्यात प्रवेश केलेला नाही मात्र शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. कृषी विभाग यासाठी सज्ज असून, शेतकऱ्यांनी दक्ष राहून टोळधाडी संदर्भात संबंधीत कृषी अधिकाºयांशी संपर्क करावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.
असे करावे नियंत्रण
अंडी घातलेल्या जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास पिल्लांना अटकाव करून नियंत्रण करता येते. अंडी शोधून सामूहिकरित्या नष्ट करावीत. टोळांची सवय थव्या थव्याने एका दिशेने पळण्याची आहे. त्यामुळे पुढे येणाºया थव्याच्या वाटेवर ६० सेमी रुंद व ७५ सेंमी खोल चर खणून त्यात या पिल्लांना पकडता येते. संध्याकाळी, रात्रीच्या वेळी झाडाझुडपावर टोळ जमा होतात अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटून तसेच टायर जाळून धूर केल्याने नियंत्रण होते. थव्यांच्या स्थितीत पिल्लांची संख्या जास्त असल्यास निमतेल प्रति हेक्टरी २.५ लिटर फवारणी प्रभावी आहे. गहू किंवा भाताचे तूस यामध्ये फिफ्रोनील ५ एस. सी. व २.९२ ई.सी. व त्यामध्ये किडीस आकर्षित करण्यासाठी मळी मिसळून रात्री किडीने आश्रय घेतलेल्या झाडाच्या आजूबाजूस प्रति हेक्टरी २० ते ३० किलो या प्रमाणे फेकून द्यावे. जेणेकरून सदर आमिष खाल्यावर किडीचा मृत्यु होईल. मिथील परोथीआन २ टक्के भुक्टी २५-३०किलो प्रति हेक्टरी धुरळणी करावी. बेंडीओकार्ब ८२ डब्लू. पी, क्लोरोपायरीफोस २० ई.सी., डेल्टामेथ्रीन २.८ युएलव्ही या किटकनाशकांची टोळ नियंत्रणासाठी शिफारस केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोंदणी समितीने केली आहे.