अतिक्रमण काढण्याकरिता गेलेल्या ग्रामसेवकाला मारहाण; ९ जणांवर गुन्हे दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2023 09:40 PM2023-05-03T21:40:29+5:302023-05-03T21:40:57+5:30

Yawatmal News मुळावा ग्रामपंचायत हद्दीमधील अतिक्रमण काढनण्यासाठी गेलेल्या ग्रामसेवकावर नऊ  नागरिकांनी हल्ला केला. या प्रकरणी मुळावा येथील नऊ जणांवर पोलीस स्टेशन पोफाळी येथे गुन्हे दाखल करण्यात आले. 

Beating the village servant who went to remove the encroachment; Cases have been registered against 9 persons | अतिक्रमण काढण्याकरिता गेलेल्या ग्रामसेवकाला मारहाण; ९ जणांवर गुन्हे दाखल 

अतिक्रमण काढण्याकरिता गेलेल्या ग्रामसेवकाला मारहाण; ९ जणांवर गुन्हे दाखल 

googlenewsNext

यवतमाळ : मुळावा ग्रामपंचायत हद्दीमधील अतिक्रमण काढनण्यासाठी गेलेल्या ग्रामसेवकावर नऊ  नागरिकांनी हल्ला केला. या प्रकरणी मुळावा येथील नऊ जणांवर पोलीस स्टेशन पोफाळी येथे गुन्हे दाखल करण्यात आले. मुळावा ग्रामपंचायतीतील अतिक्रमणधारकांची दादागिरी वाढली असल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले.    

    ग्रामपंचायतलगत गावातील मुख्य रस्त्याला लागून अतिक्रणात  असलेली मांसविक्रीची दुकाने काढण्यासाठी बुधवारी सरपंच, सचिव व सदस्य तसेच कर्मचारी गेले होते. मांसविक्री करणाऱ्या दुकानदारांनी आमचे अतिक्रमण काढता का असा प्रश्न करत गंभीर  मारहाण केली. यावेळी परिसरात पेट्रोलींगसाठी आलेल्या पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे अनर्थ टळला.

घटनेची फिर्याद ग्रामसेवक धम्मपाल आढागळे यांनी पोलीस स्टेशन पोफाळी दिली. त्यावरून अहमद कुरेशी, शे. सलीम शे. शब्बीर, नदीम हकीम कुरेशी, अबेद मुस्तफा कुरेशी, निहाल हाकीम कुरेशी, शे. मवसीन शे. गफार, राजीक सादिक कुरेशी, शे. मुस्तफा वाहाब कुरेशी, गोरू हमिद कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. वृत्त लिहेपर्यंत कुठल्याच आरोपीला ताब्यात घेतल्या गेले नाही. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप निरीक्षक राजेश पंडीत, जमादार देविदास आठवले, संदीप शेरे, राम गडदे करीत आहेत.

Web Title: Beating the village servant who went to remove the encroachment; Cases have been registered against 9 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.