कोरोनामुळे महिला पोलिसांसाठी समाजच बनला कुटुंब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 05:00 AM2020-04-15T05:00:00+5:302020-04-15T05:00:45+5:30

कर्तव्य निभावत असताना महिला पोलिसांच्या मनात कुठलाही संकोच नाही. केवळ राष्ट्राप्रती समर्पण भावनेतून त्या काम करीत आहे. स्वत:च्या सुरक्षेची खबरदारीही त्या घेत आहे. सोबतच कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत आहे. या रनरागिणी जनतेच्या सुरक्षेसाठी आपले घरदार विसरून कर्तव्य पार पाडत आहे. देश, राज्य, जिल्ह्यातील जनतेला कोरोनापासून वाचविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.

Because of Corona social responsibility became a family for women police! | कोरोनामुळे महिला पोलिसांसाठी समाजच बनला कुटुंब !

कोरोनामुळे महिला पोलिसांसाठी समाजच बनला कुटुंब !

Next
ठळक मुद्देचौका चौकात कर्तव्यावर हजर : भीती अजिबात नाही, आहे ती समर्पणाची भावना

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनामुळे सर्व घरात बंदिस्त झाले आहे. या काळात इतर कर्मचाऱ्यांसह पोलीस जनतेच्या सेवेत व्यस्त आहे. घरोघरी महिला कुटुंबाच्या सेवेत असताना महिला पोलीस कर्मचारी मात्र कर्तव्य बजावत आहे. सतत १२ तास ड्यूटी निभावत आहे. पोलीस मुख्यालय, क ळंब चौक, बसस्थानक चौक, दर्डा नाका, तिवारी चौक, दत्त चौक, स्टेट बँक चौक या भागात महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
कर्तव्य निभावत असताना महिला पोलिसांच्या मनात कुठलाही संकोच नाही. केवळ राष्ट्राप्रती समर्पण भावनेतून त्या काम करीत आहे. स्वत:च्या सुरक्षेची खबरदारीही त्या घेत आहे. सोबतच कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत आहे. या रनरागिणी जनतेच्या सुरक्षेसाठी आपले घरदार विसरून कर्तव्य पार पाडत आहे. देश, राज्य, जिल्ह्यातील जनतेला कोरोनापासून वाचविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
यवतमाळात कर्तव्यावर असलेल्या भारती, सुवर्णा काम करतात. त्या अनेक वर्षांपासून नोकरी करीत आहे. ‘देशसेवा’ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी पोलीस दलात प्रवेश केला. त्या ड्यूटीवर येण्यापूर्वी घरातील दैनंदिन कामे आटोपतात. मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत आहेत.
जयश्री, प्रिती, सारिका आणि चैताली यांची चेकपोस्टवर ड्यूटी लावण्यात आली. तेथे त्या सलग १२ तास काम करतात. पहाटे ५ वाजतापासून त्यांची दिनचर्या सुरू होते. सकाळी व्यायाम आणि नंतर घरातील दैनंदिन कामे केल्यानंतर त्या कर्तव्यावर हजर होतात. अनिता २३ वर्षांपासून नोकरीत आहे. कोरोनामुळे त्यांच्यावर सर्वाधिक जबाबदारी आहे. लॉकडाऊनमुळे त्यांच्या घरी पाहुणे अडकले आहे. त्यात नातेवाईकांचे लहान बाळ आहे. परिणामी जबाबदारी वाढली. घरच्या कामासोबत फिल्डवरही काम वाढले. मात्र कुणालाही कोरोना होऊ नये, याची खबरदारी घेत त्या कर्तव्य निभावत आहे. वनिता ५ वर्षांपासून दामिनी पथकात आहे. कोरोनामुळे त्यांच्या आईने रजा घेण्याची सूचना केली. मात्र जबाबदारी सोडून पळ काढणार नाही, असे म्हणत त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले. सरिता नुकत्याच पोलीस दलात रुजू झाल्या. कुटुंबातील प्रत्येकाला त्यांची काळजी वाटते. मात्र या संकटकाळात सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडणारच, या निश्चयाने कर्तव्य बजावत आहे.

महिला विनाकारण बाहेर पडत नाहीत
संचारबंदीत घराबाहेर पडणाऱ्यांची पोलिसांतर्फे प्रत्येक चौकात तपासणी केली जाते. घराबाहेर निघणाऱ्यांमध्ये पुरूषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण नगण्य आहे. महिला विनाकारण घराबाहेर पडत नाहीत, असे मत महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. जनतेच्या सेवेसाठी शासकीय यंत्रणेसह आम्ही पोलीस तत्पर असून जनतेने नियमांचे तंतोतंत पालन करून या संकटकाळात सहकार्य करावे, असे आवाहनही महिला पोलिसांनी केले.

नातेवाईक म्हणतात, काळजी घे!
भारती, सुवर्णा या महिला पोलीस सायंकाळी घरी परतल्यानंतर प्रथम गणवेश धुऊन काढतात. अंघोळीनंतरच घरात प्रवेश करतात. त्यांना आई, वडील, सासू, सासरे, पती आणि इतर नातेवाईक वारंवार काळजी घेण्याची सूचना करतात. कुटुंबाचा हा जिव्हाळा, आपुलकी बघून त्यांना आपल्या कर्तव्याचे चिज झाल्यासारखे वाटते. मात्र घर आणि कर्तव्य याची सांगड घालताना त्यांना दररोज तारेवरची कसरत करावी लागते.

तान्हुल्याला घरी सोडून कर्तव्यावर
पोलीस दलातील जयश्री यांची कहाणी फारच वेगळी आहे. पोटच्या बाळाला घरी सोडून त्या ड्यूटी करीत आहेत. त्यांच्या मनाची घालमेल होतेच, पण कर्तव्याला त्यांनी प्राधान्य दिले. दिवसभर उन्हातान्हात काम करून नंतर त्यांना तान्हुल्याला सांभाळावे लागते. जनतेच्या रक्षणात आपलाही खारीचा वाटा असल्याचे समाधान व्यक्त करताना त्या म्हणतात, तान्हुल्याला पाहिल्यावर दिवसभराचा ताण कमी होतो.

महिला म्हणजे कुटुंब सांभाळणारी महत्त्वाची व्यक्ती. पण पोलीस असलेल्या महिलांसाठी सध्या समाज म्हणजेच घर झाले आहे. कोरोनाच्या संकटात घरदार बाजूला सारून त्यांना चौका चौकात कर्तव्य बजावावे लागत आहे. यवतमाळात १२५ महिला पोलीस उन्हातान्हात रस्त्यावर आहे. मुख्यालय, शहर ठाणे, अवधूतवाडी आणि लोहारा ठाण्यातील महिला पोलिसांचा यात समावेश आहे. मात्र त्यांच्या मनात भीतीचा लवलेशही नाही, उलट समर्पण भावना अधिक आहे.

Web Title: Because of Corona social responsibility became a family for women police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.