बेलोराची स्वाती झाली विक्रीकर निरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 09:10 PM2018-01-09T21:10:59+5:302018-01-09T21:11:31+5:30
परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तालुक्यातील बेलोरा येथील स्वाती राजकुमार वानखडे या तरूणीने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवित यश संपादित केले.
आॅनलाईन लोकमत
दिग्रस : परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तालुक्यातील बेलोरा येथील स्वाती राजकुमार वानखडे या तरूणीने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवित यश संपादित केले. तिची विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली. याबद्दल तिचा गावकºयांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
स्वाती वानखडे हिने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. घरची आर्थिक परिस्थिती नसतानाही तिच्या आई-वडीलांनी शिक्षणासाठी परिश्रम घेतले. नुकत्याच लागलेल्या विक्रीकर निरीक्षक पदाच्या परीक्षेत ती उतीर्ण झाली. खुल्या प्रवर्गातून तिची निवड करण्यात आली. परिश्रम आणि चिकाटीने कोणतेही यश सहज साध्य असल्याचे तिने सांगितले. स्वातीचे वडील राजकुमार वानखडे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहे. स्वातीच्या या यशाबद्दल गावकºयांनी तिचा सत्कार केला.