बेलोराचा ‘तो’ डॉक्टर अद्याप चौकशीतच

By admin | Published: January 25, 2017 12:14 AM2017-01-25T00:14:24+5:302017-01-25T00:14:24+5:30

कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेदरम्यान तीन महिलांचे आतडे कापणाऱ्या डॉक्टरवर तत्काळ कारवाई होणार अशी अपेक्षा फोल ठरली

Belore's 'Doctor' still in inquiry | बेलोराचा ‘तो’ डॉक्टर अद्याप चौकशीतच

बेलोराचा ‘तो’ डॉक्टर अद्याप चौकशीतच

Next

कुटुंब कल्याण शस्त्रक्रियाप्रकरण : जखमी महिलांना रुग्णालयात संसर्गाचा धोका
यवतमाळ : कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेदरम्यान तीन महिलांचे आतडे कापणाऱ्या डॉक्टरवर तत्काळ कारवाई होणार अशी अपेक्षा फोल ठरली असून आठवडाभर या प्रकरणाची चौकशीच चालणार आहे. त्यानंतर ‘त्या’ डॉक्टरवर कारवाई होण्याचे संकेत आहे. तूर्तास दोन महिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असून त्यांनाही संसर्गाचा धोका वाढला आहे. एकंदर या प्रकरणात प्रशासन बेजबाबदार पणे वागत असून मंत्र्यांनीही याकडे लक्ष दिले नाही.
पुसद तालुक्यातील बेलोरा आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेदरम्यान तीन महिलांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यापैकी शारदा काळे हिचा मृत्यू झाला. तर अरुणा चव्हाण आणि वंदना देवकते यांची प्रकृती गंभीर झाली. शस्त्रक्रिया करणारे डॉ. स्वप्नील सातपुते यांच्या चुकीमुळे या महिलांचे आतडेच कापल्याचे प्रकरण पुढे आले. गंभीर प्रकार असतानाही प्रशासनाकडून दोषी डॉक्टरवर कारवाई करण्याऐवजी केवळ शासकीय सोपस्कार पार पाडले जात आहे. तर दुसरीकडे याच घटनेतील दोन महिलांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. त्यांना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. वंदनाच्या पोटात संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर येथे उपचार सुरू आहे.
सामान्य माणसाकडून चूक झाल्यास प्रथम कारवाई आणि नंतर चौकशी केली जाते. परंतु येथे डॉक्टर असल्याने नरमाईची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर भोंगाडे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील सातपुते दोषी असतानाही त्यांंना अभय दिले जात आहे. आता चौकशी समितीचा अहवाल येण्यास आठवडा लागणार आहे. तोपर्यंत या डॉक्टरांवर कारवाई करता येणार नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणातील बेलोरा आरोग्य केंद्राचे वादग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव डॉ. स्वप्नील सातुरवार नव्हे तर डॉ. स्वप्नील सातपुते असल्याचे स्पष्ट करण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Belore's 'Doctor' still in inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.