बेंबळाचे पाणी फेब्रुवारीत थेट निळोणा फिल्टरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 10:11 PM2017-11-07T22:11:07+5:302017-11-07T22:11:18+5:30

यंदा केवळ ४० टक्के पाऊस झाल्याने उन्हाळ्यात यवतमाळ शहरात तीव्र पाणीटंचाईची चिन्हे दिसत असतानाच नागरिकांना दिलासा देणारा निर्णय मंगळवारी नगरपरिषदेच्या विशेष सभेत घेण्यात आला.

Bendable water filter directly into the filter in February | बेंबळाचे पाणी फेब्रुवारीत थेट निळोणा फिल्टरमध्ये

बेंबळाचे पाणी फेब्रुवारीत थेट निळोणा फिल्टरमध्ये

Next
ठळक मुद्देयवतमाळकरांना दिलासा : साडेतीन कोटींचा आराखडा मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यंदा केवळ ४० टक्के पाऊस झाल्याने उन्हाळ्यात यवतमाळ शहरात तीव्र पाणीटंचाईची चिन्हे दिसत असतानाच नागरिकांना दिलासा देणारा निर्णय मंगळवारी नगरपरिषदेच्या विशेष सभेत घेण्यात आला. तातडीची उपाययोजना म्हणून साडेतीन कोटी रुपये खर्च करून फेब्रुवारीपूर्वी बेंबळा धरणातील पाणी थेट निळोणा धरणाच्या फिल्टर प्लाँटपर्यंत पोहोचविले जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यासाठी लागणाºया १० टक्के अर्थात ३५ लाख रुपये लोकवर्गणीचा भार नगरपरिषदेने उचलला आहे.
पाणीटंचाई उपाययोजनांसाठी पालकमंत्री मदन येरावार आग्रही आहे. शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. मात्र ‘अमृत’ योजनेतील निधी तातडीच्या कामासाठी मिळणार नाही, हे लक्षात येताच नवीन साडेतीन कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी आपल्या निधीतील दहा टक्के रक्कम लोकवर्गणी म्हणून देण्याचे मान्य केले. त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था सुरू होईल, असा आशावाद मजिप्राचे कार्यकारी अभियंता अजय बेले यांनी पालिका सभागृहात व्यक्त केला.
सभेत शहरात काही भागात वॉटर एटीएमचा प्रयोग करण्याबाबत चर्चा झाली. मात्र काही सदस्यांनी टंचाईच्या काळात हा प्रयोग राबवून होणाºया पाण्याचा अपव्यय झेपेल काय, असा प्रश्न उपस्थित केला. याशिवाय नगरसेवकांच्या सुचनेवरून प्रत्येक प्रभागात विहीर खोदून हातपंप लावणे, सबमर्सिबल पंप लावणे, पाईपलाईन टाकणे, विहीर सफाई, विहिरीवर जाळी टाकणे, विहिरींची दुरुस्ती, आदींचा आराखडा तयार केला आहे. त्याकरिता तीन कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून हा निधी जिल्हा नियोजन समितीच्या उपाययोजना निधीतून मागण्याचा ठराव सभेत घेण्यात आला.
खासगी बांधकाम बंदीच्या निर्णयाबाबत नगरसेवकांनी आक्षेप नोंदविले. शासकीय बांधकामांचे काय, असा प्रश्न खुद्द नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी उपस्थित केला.
शहरात १४ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून त्यावर आत्तापर्यंत २७ लाख रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले. यावर नगरसेवकांनी आक्षेप नोंदविला. २७ लाखांची बिले काढताना कोणतीही अनियमितता होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश उपाध्यक्ष सुभाष राय यांनी दिले. टंचाई काळात सर्वांपर्यंत टँकर पोहोचतील, अशी मागणी नगरसेवकांनी केली. हा विषय टिपणीत नमूद करताना पाणीपुरवठा विभागाने टँकरच्या फेरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग उपस्थित नसल्याचे नमूद केले. त्यावर नगरसेवक प्रवीण प्रजापती यांनी आक्षेप नोंदवित यंत्रणेने कायदेशीरबाबीचे पालन करावे, अशा प्रकारे जबाबदारी झटकता येणार नाही, असे स्पष्ट केले. सुरुवातीला भाजपा गटनेते विजय खडसे यांनी झालेल्या सभेच्या इतिवृत्ताचा मुद्दा उपस्थित केला. नगराध्यक्ष स्वाक्षरी करीत नसल्याने ठराव घेऊनही उपयोग होत नसल्याचे सभागृहात सांगितले. यावर इतिवृत्तच स्वाक्षरीसाठी आले नसल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्ष-बांधकाम सभापतीत कलगीतुरा
पालिकेच्या सभेत नगराध्यक्ष व बांधकाम सभापतींमधील खडाजंगी सर्वश्रृत आहे. मंगळवारच्या सभेत स्थायीच्या तहकुबचा मुद्दा नगराध्यक्षांनी छेडताच दोघांमध्ये ‘तू-तू-मै-मै’ झाली. शेवटी विरोधी पक्षनेत्याने मध्यस्थी केल्यानंतर हा वाद संपुष्टात आला.
भाजपा सदस्य म्हणतो, सभागृहावर विश्वास नाही
नगरपालिका सभागृहात निर्णय होऊन कोणतेच काम केले जात नाही. प्रत्येक बाबतीत दिशाभूल होते, त्यामुळे या सभागृहावरच माझा विश्वास नसल्याचे भाजपा नगरसेवक दिनेश चिंडाले यांनी बैठकीत सांगितले.

Web Title: Bendable water filter directly into the filter in February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.