देशासाठी सौर ऊर्जा उत्तम पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 09:24 PM2017-09-16T21:24:44+5:302017-09-16T21:25:02+5:30

भारत हा जगातील पाचवा सर्वाधिक ऊर्जा वापरणारा देश आहे. औष्णिक व जलविद्युत ऊर्जेवर भारताला अवलंबून राहावे लागते. भविष्यातील ऊर्जेचे संकट टाळण्यासाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर करणे गरजेचे आहे.

The best option for solar energy for the country | देशासाठी सौर ऊर्जा उत्तम पर्याय

देशासाठी सौर ऊर्जा उत्तम पर्याय

Next
ठळक मुद्दे कमलसिंह : कुलगुरू के.जी. देशमुख स्मृती व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : भारत हा जगातील पाचवा सर्वाधिक ऊर्जा वापरणारा देश आहे. औष्णिक व जलविद्युत ऊर्जेवर भारताला अवलंबून राहावे लागते. भविष्यातील ऊर्जेचे संकट टाळण्यासाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर करणे गरजेचे आहे. त्यातही सौर ऊर्जा हा देशासाठी उत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन जी. एस. रायसोनी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. कमलसिंह यांनी केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे येथील फुलसिंग नाईक महाविद्यालयात आयोजित अमरावती विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. के. जी. देशमुख स्मृती व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. त्यांनी ‘अपारंपारिक ऊर्जा स्रोत व उपाययोजना’ या विषयावर विचार मांडले. अध्यक्षस्थानी संत गाडगेबाबा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. राजेश जयपुरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जय नाईक, माजी कुलगुरू डॉ. शेषराव सूर्यवंशी, डॉ. कमल देशमुख, डॉ. श्रीनिवास ओमनवार, दीपक आसेगावकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदूरकर, प्राचार्य डॉ. संजीव मोटके उपस्थित होते.
यावेळी डॉ. कमलसिंह यांनी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जल विद्युत, जैविक ऊर्जा यावर सादरीकरण करून अपारंपारिक ऊर्जा स्रोतांची माहिती दिली. या ऊर्जेमुळे देशाच्या विकासाला हातभार लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच ही ऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून त्यापासून पर्यावरणाला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुरूवातीला अमरावती विद्यापीठाचे गीत सादर करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. विलास नांदूरकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. मोटके यांनी करून दिला. प्रथम कुलगुरू डॉ. के.जी. देशमुख यांच्या कार्याचा आलेख सादर केला. डॉ. कमल देशमुख यांनी त्यांचे पती हाडाचे शिक्षक होते, असे सांगून ज्ञान हे त्यांचे ब्रिद असल्याचे सांगितले. संचालन प्रा. विलास भवरे यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. एच. बी. नानवाला, प्रा. डॉ. विश्वजित ठाकरे, प्राचार्य डॉ. हेमंत महल्ले, प्रा. के. जी. कडस्कर, प्रा. डॉ. अविनाश वानखेडे, प्रा. गोविंद फुके, प्रा. राजेश पाचकोर, प्रा. हाटे, माजी नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, उपप्राचार्य अप्पाराव चिरडे, पर्यवेक्षक प्रा. दिनकर गुल्हाने आदी उपस्थित होते.

Web Title: The best option for solar energy for the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.