सावधान! महामार्गावरील दुभाजक तोडाल तर होई­ल पाच वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2022 10:24 PM2022-11-13T22:24:31+5:302022-11-13T22:24:58+5:30

व्यवसाय मार खातो म्हणून दुभाजक तोडण्याचा उद्दामपणा करण्यात आला आहे. यामुळे मोठा धोका निर्माण होतो.  राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची सरासरी गती निर्धारित केली आहे. रस्त्याला वळण न ठेवता तो सरळ केला आहे.  दुभाजकामुळे रस्ता वाहतूक जास्त सुरक्षित होते. सहज कुणालाही टर्न घेता येत नाही. दुभाजक तोडून अपघात प्रवणस्थळच निर्माण केले जात आहे. 

Beware! If you break the divider on the highway, you will be imprisoned for five years | सावधान! महामार्गावरील दुभाजक तोडाल तर होई­ल पाच वर्षे कारावास

सावधान! महामार्गावरील दुभाजक तोडाल तर होई­ल पाच वर्षे कारावास

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघाताची चिकित्सा करण्यात आली. रस्ता सरळ व सुटसुटीत असतानाही अपघात का होतात, हा प्रश्न उपस्थित करून चौकशी केली असता तब्बल ३०२ प्राणांकित अपघात झाले. यात ३१८ जणांचा मृत्यू झाला. यावरून राष्ट्रीय महामार्ग ३६१ यावर कळंब ते उमरखेड दरम्यान जिल्हा वाहतूक शाखा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जिल्हा पोलिस दल यांच्याकडून संयुक्त प्रयत्न करण्यात आले. यात अनेक व्यावसायिकांनी आपल्या सोईसाठी महामार्गावरील दुभाजक तोडल्याचे आढळून आले. अशा विरोधात पोलिसांनी स्वत:हून तक्रार देत आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. यात पुढील कारवाई केली जात आहे. पहिल्यांदाच अशी कारवाई झाली. 
शासकीय संपत्तीचे नुकसान पडेल महागात
- भारतीय दंड विधान यातील कलम ४३१ गुन्हा दाखल करून त्यात पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. 
- याशिवाय सार्वजनिक मालमत्ता नुकसान अधिनियम यातील कलम ३, ५ नुसार गुन्हा दाखल केला जातो व कारवाई होते. 

जिल्ह्यात दहा महिन्यांत नऊ जणांवर कारवाई 
पोलिसांनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुभाजक तोडणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. महामार्गावर नऊ ठिकाणी सोयीसाठी दुभाजक तोडल्याचे निदर्शनास आले आहे. यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहे. 

अपघाताची शक्यता वाढते 
ठरावीक अंतरावरच महामार्गाच्या दुभाजकावर वळण्यासाठी जागा दिलेली आहे. मात्र, व्यावसायिकांनी आपला ढाबा, पेट्रोलपंप याच्यासमोरच दुभाजक तोडल्याने लेन कटिंगचा प्रकार वाढला. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे. 

पेट्रोलपंप, हॉटेल चालकांनो सावधान
व्यवसाय मार खातो म्हणून दुभाजक तोडण्याचा उद्दामपणा करण्यात आला आहे. यामुळे मोठा धोका निर्माण होतो. 
राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची सरासरी गती निर्धारित केली आहे. रस्त्याला वळण न ठेवता तो सरळ केला आहे. 
दुभाजकामुळे रस्ता वाहतूक जास्त सुरक्षित होते. सहज कुणालाही टर्न घेता येत नाही. दुभाजक तोडून अपघात प्रवणस्थळच निर्माण केले जात आहे. 

राष्ट्रीय महामार्गावर कळंब ते उमरखेड दरम्यान कारवाई
- नागपूर ते तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ जिल्ह्यातून जातो. या मार्गावर अपघात वाढले. याचे कारण शोधले असता कळंंब ते उमरखेड दरम्यान अनेक ठिकाणी सोईने दुभाजक तोडल्याचे आढळून आले आहे. 
 

Web Title: Beware! If you break the divider on the highway, you will be imprisoned for five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.