सावधान, तुमच्या नावाने सेक्स रॅकेट तर चालत नाही ना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:27 AM2021-06-29T04:27:51+5:302021-06-29T04:27:51+5:30
महागाव : एक कथित तरुणी फेसबुक चॅटिंगच्या माध्यमातून जिल्ह्यात नवतरुणांना आकर्षित करू पाहत आहे. आज कुठे, उद्या कुठे, ...
महागाव : एक कथित तरुणी फेसबुक चॅटिंगच्या माध्यमातून जिल्ह्यात नवतरुणांना आकर्षित करू पाहत आहे. आज कुठे, उद्या कुठे, कोणाला भेटणार, कोण पाहिजे आहे, असा फेसबुक मेसेज ती प्रत्येकाला पाठवत आहे. मात्र, अद्याप जिल्ह्यात कोणी तरुण तिच्या प्रलोभनाला बळी पडल्याचे ऐकीवात नाही.
सायबर गुन्हेगारांनी एक नवी शक्कल शोधली आहे. ‘एस्कॉर्ट सर्व्हस’च्या नावाखाली हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या या गुन्हेगारांनी विविध शहरातील प्रतिष्ठितांची फेसबुक आयडी हॅक करणे सुरू केले. कुणाच्याही नावाची डमी फेसबुक आयडी तयार करून त्यावर ते देखण्या तरुणींचे फोटो अपलोड करतात. यापूर्वी सायबर गुन्हेगारांनी लॉटरी लागल्याची, डेबिट-क्रेडिट कार्ड ब्लॉक झाल्याची, केवायसी अपडेट करण्याची, कर्ज, नोकरी देण्याची थाप मारून अनेकांना गंडा घातला आहे. विशेष म्हणजे खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नावाने फेसबुक रिक्वेस्ट टाकून पैशांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्याचे आरोपी अद्याप मिळाले नाही.
काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगारांनी ‘सेक्स टॉर्शन’ हा प्रकार सुरू करून व्हीडिओ कॉल करत ऑनलाईन सेक्सची ऑफर देत अनेकांचे कपडे उतरविले आहे. तो व्हीडिओ नंतर संबंधित व्यक्तीला पाठवून त्याला बदनामीचा धाक दाखवून लाखोंची रक्कम उकळली. आता ‘सोशल मीडिया हॅकिंग आणि सेक्स टॉर्शन’च्या साखळीतील नवीन प्रकार उजेडात आला आहे. तुम्ही कोणत्याही गावात, शहरातील असा, त्याच्याशी सायबर गुन्हेगारांना देणे-घेणे नाही. ते डमी फेसबुक आयडीचा वापर करून सेक्स रॅकेट चालवितात. असे प्रकार इतर जिल्ह्यांमध्ये पुढे आले आहे. मात्र, बदनामीच्या धाकाने त्याची तक्रार करणाऱ्यांची संख्या नगण्य आहे.
बॉक्स
ती तरुणी नसून किन्नर
सध्या एका तरुणीच्या फेसबुक रिक्वेस्टवरून असे लक्षात येते की ती सध्या यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या तरी अलिशान हॉटेलमध्ये थांबलेली आहे. तिच्या फेसबुक अकाैंटवरून ती महिला नसून किन्नर असल्याचेही लक्षात येते. जिल्ह्यात कोणी तरुण-तरुणीची फसगत होण्याआधीच सायबर क्राईमने या तरुणीचा छडा लावण्याची गरज आहे.