भारिप-बहुजन महासंघाचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 10:05 PM2018-03-03T22:05:22+5:302018-03-03T22:05:22+5:30
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीतील आरोपींना अटक करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शनिवारी भारिप-बहुजन महासंघातर्फे तिरंगा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीतील आरोपींना अटक करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शनिवारी भारिप-बहुजन महासंघातर्फे तिरंगा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.
कोरेगाव-भीमा दंगलीस मिलींद एकबोटे आणि संभाजी भिडे जबाबदार असून पोलिसांनी अद्यापही त्यांना अटक केली नाही. या दंगलीस जबाबदार असणारे एकबोटे आणि भिडे यांना त्वरित अटक करावी, अशी प्रमुख मागणी भारिप-बहुजन महासंघाने केली. याशिवाय अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती महागाई निर्देशांकानुसार द्यावी, विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता १५०० रूपये करावा, ओबीसी, एसबीसी, व्हीजेएन्टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढवून सरसकट १०० टक्के करावी, यासह इतर मागण्यांचा यात समावेश होता. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तलवारे, अॅड. संजयकुमार इंगळे, विशाल पोले, ईश्वर तायडे, प्रसन्नजित भवरे, अजय खंडारे, कुंदन नगराळे, सचिन मुनेश्वर, सचिन भिमटे, नीलेश भगत यांच्यासह भारिप-बमसंच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलनात सहभाग घेतला.