भारिप-बहुजन महासंघाचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:24 PM2018-09-25T22:24:57+5:302018-09-25T22:26:00+5:30
भारिप-बहुजन महासंघाचा सत्तासंपादन व पक्षप्रवेश मेळावा प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि चंदन तेलंग यांच्या अध्यक्षतेत पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भारिप-बहुजन महासंघाचा सत्तासंपादन व पक्षप्रवेश मेळावा प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि चंदन तेलंग यांच्या अध्यक्षतेत पार पडला. सिरसकर, हरिभाऊ भदे, प्रदेश महासचिव गुणवंतराव देवपारे, सागर डबरासे, युसुफसेठ पुंजानी, कुशल मेश्राम, उपाध्यक्ष हिरासिंग राठोड, सहसचिव प्रा. सुरेश शेळके, महिला आघाडीच्या पुष्पाताई इंगळे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष रणधीर खोब्रागडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी भारिप-बहुजन महासंघात यावेळी प्रवेश केला. यात प्रामुख्याने घाटंजीच्या माजी नगराध्यक्ष चंद्रलेखा रामटेके, माजी सभापती सुखदेवराव रामटेके, बेबी मेश्राम, राजा गणवीर, सुनील बोरकर, निसार अहमद, मयुद्दिन सौदागर, आनंद भगत, करुणा कांबळे, विश्वनाथ हनवते, संतोष पेंदोर, नामदेवराव वाणी, भास्करराव पंडागळे, अॅड. रऊफ शेख, मुनेश्वर यांचा समावेश आहे.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. संचालन जगदीश भगत यांनी, तर आभार प्रा.डॉ. अनिल काळपांडे यांनी मानले. मेळाव्यासाठी प्रकाश देवपारे, हर्षवर्धन खोब्रागडे, महावीर खोब्रागडे, संतोष मोरे, विवेक वाहुरवाघ, धम्मावती वासनिक, करुणा मून, संध्या काळे, ताई वागदे, अनिल चुनारकर, गुणवंत मानकर, प्रमोद पाटील, खंडेश्वर कांबळे, भारसाकळे, आनंद शिरसाट, दिनेश करमनकर, सुनील पाटील, सुरेश देशभ्रतार, प्रसेनजित भवरे आदींनी पुढाकार घेतला.