शेतकऱ्यांसाठीच भाऊसाहेबांचा लढा

By admin | Published: December 27, 2015 02:48 AM2015-12-27T02:48:30+5:302015-12-27T02:48:30+5:30

शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांनी शैक्षणिक क्षेत्रातच नव्हेतर सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविला.

Bhausaheb's fight for farmers only | शेतकऱ्यांसाठीच भाऊसाहेबांचा लढा

शेतकऱ्यांसाठीच भाऊसाहेबांचा लढा

Next

प्रवीण भोयर : नेर येथे जयंती उत्सव व स्नेहसंमेलन
नेर : शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांनी शैक्षणिक क्षेत्रातच नव्हेतर सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविला. भारतातील शेतकरी अत्यंत दयनीय अवस्थेत जगत आहे. येथील व्यवस्थेने त्याचे अतोनात शोषण केले. हे जाणून भाऊसाहेबांनी वैश्विक दृष्टिकोन ठेवून जगातील शेतकरी सुखी व्हावा, यासाठी लढा दिला, असे प्रतिपादन प्रा.प्रवीण भोयर यांनी केले.
स्थानिक श्री शिवाजी हायस्कूलमध्ये आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख जयंती उत्सव व स्रेहसंमेलनात प्रमुख वक्ते म्हणून प्रा.भोयर बोलत होते. भाऊसाहेब हे दूरदृष्टीचे सामाजिक जाण व भान असलेले नेते होते. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी जागतिक स्तरावर कृषी प्रदर्शन आयोजित केले व महासत्ता असलेल्या राष्ट्रप्रमुखांना एकत्र आणून सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शिक्षण संस्थांची स्थापना, देवस्थान बिल, डॉ.आंबेडकरांच्या आवाहनावरून अंबादेवी मंदिर मुक्ती लढा असे उत्तुंग कार्य भाऊसाहेबांनी केले, असे प्रा.भोयर यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबू पाटील जैत होते. शेतकऱ्यांनी एकत्र येवून लढा देणे गरजेचे आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारणे हीच भाऊसाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मनोगत जैत यांनी व्यक्त केले. विचारपीठावर नगराध्यक्ष पवन जयस्वाल, संजय वानखडे, मधुकरराव बोबडे, उत्तमराव ठाकरे, सुधीर माळवे, सुभाष ठाकरे, अनिल मिसाळ, कमलेश चरडे, तेजस नाव्हे, आकांक्षा जुमळे उपस्थित होते.
यावेळी शालांत परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला. विज्ञान प्रदर्शन, पाककला प्रदर्शन, पुष्प प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदींचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक चंद्रशेखर आगलावे तर सूत्रसंचालन गिरीश कनाके यांनी केले. आभार किशोर चव्हाण यांनी मानले.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Bhausaheb's fight for farmers only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.