शेतकऱ्यांचा विकासच भाऊसाहेबांचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 09:47 PM2019-01-07T21:47:04+5:302019-01-07T21:47:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : भारतातील शेतकऱ्यांचा विकास हेच भाऊसाहेबांचे ध्येय होते. म्हणूनच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकºयांसाठी खर्ची ...

Bhausaheb's goal for development of farmers | शेतकऱ्यांचा विकासच भाऊसाहेबांचे ध्येय

शेतकऱ्यांचा विकासच भाऊसाहेबांचे ध्येय

Next
ठळक मुद्देख्वाजा बेग : शिवाजी विद्यालयात जयंती उत्सव, विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भारतातील शेतकऱ्यांचा विकास हेच भाऊसाहेबांचे ध्येय होते. म्हणूनच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकºयांसाठी खर्ची घातले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी केले.
येथील शिवाजी विद्यालयात डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती उत्सवानिमित्त मुख्य सोहळ्यात ते बोलत होते. शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीव सभासद अ‍ॅड. भैयासाहेब पावडे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका उषा दिवटे, अशोक घारफळकर, मुख्याध्यापिका एस.एस. शेंडे, पर्यवेक्षक जी.एस. कणसे, संदीप ठाकरे, संजय पुरी, राजश्री कासलीकर, अनिल देशमुख आदी उपस्थित होते.
भैयासाहेब पावडे यांचे अध्यक्षीय मार्गदर्शन झाले. उपस्थित पाहुण्यांनी समयोचित विचार मांडले. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. मिलिंद वाळके व चमूने स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका एस.एस. शेंडे, संचालन धैर्यशील चौधरी यांनी केले. प्रा. सुनील कडू यांनी आभार मानले. यावेळी प्रवीण भोयर आदींची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांचा गुणगौरव
शिवाजी विद्यालयात विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. पर्यवेक्षक जी.एस. कणसे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक उद्धवराव साबळे, साधनाताई काळे, नितीन बांगर, विशाल पावडे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संतोष गुरनुले, संयोजक राजश्री कासलीकर आदी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शन, हस्तकला, पोस्टर, रांगोळी आदी स्पर्धात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. संचालन धैर्यशील चौधरी यांनी केले.

Web Title: Bhausaheb's goal for development of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.