भावना गवळी यांची जिल्हा बँकेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 10:31 PM2018-05-26T22:31:32+5:302018-05-26T22:31:32+5:30

खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. दरम्यान, शनिवारी खासदार भावना गवळी यांनी अचानक यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याच्या विषयावरुन त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.

Bhavna Gavli's hit on District Bank | भावना गवळी यांची जिल्हा बँकेवर धडक

भावना गवळी यांची जिल्हा बँकेवर धडक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. दरम्यान, शनिवारी खासदार भावना गवळी यांनी अचानक यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याच्या विषयावरुन त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
बँकेचे सरव्यवस्थापक अरविंद देशपांडे यांनी भावना गवळी यांना कर्जवाटपाची माहिती दिली. जिल्हा बँकेला या वर्षी ५२३ कोटींचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले आहे. आतापर्यंत ४० टक्के पीककर्ज वाटण्यात आले आहे. इतर राष्ट्रीय बँकांनी फक्त दोन टक्के पीककर्ज वाटप केल्याची माहिती समोर आली. शेतकऱ्यांना दहा ते १५ हजार रुपये कर्ज दिले जात आहे. एवढ्या रकमेत बियाणे, खते शेतकरी खरेदी करु शकत नाही. किमान ४० हजार रुपये तरी कर्ज देण्याच्या सूचना खासदार भावना गवळी यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. बँक अशाप्रकारे शेतकऱ्यांना अत्यल्प कर्ज देऊन एकप्रकारे सावकारीकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचा आरोप भावना गवळी यांनी केला.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, उपजिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, तालुका प्रमुख किशोर इंगळे, संजय रंगे, यवतमाळ पंचायत समितीचे सभापती एकनाथ तुमकर, उपसभापती गजानन पाटील, शहर प्रमुख पिंटू बांगर, राजू कोहरे, चेतन शिरसाट, राजू नागरगोजे, प्रवीण पाचकवडे, गणेश आगरे, कोकुलवार, दीपक पिसके, अनुप चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Bhavna Gavli's hit on District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.