गोरक्षणासाठी भीमरावची धडपड

By Admin | Published: May 27, 2016 02:14 AM2016-05-27T02:14:37+5:302016-05-27T02:14:37+5:30

शासन गोरक्षणासाठी विविध प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून गोरक्षणासाठी निधीही उपलब्ध करून दिला जातो.

Bhimrao's struggle for protection | गोरक्षणासाठी भीमरावची धडपड

गोरक्षणासाठी भीमरावची धडपड

googlenewsNext

दीडशे गायींचे पोषण : स्वखर्चातून चालवितात उपक्रम
पुसद : शासन गोरक्षणासाठी विविध प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून गोरक्षणासाठी निधीही उपलब्ध करून दिला जातो. परंतु पुसद तालुक्यातील सत्तरमाळ येथील भीमराव जाधव यांचा गोरक्षणासाठी एकाकी लढा सुरू आहे. स्वखर्चातून दीडशे गायींचे पालनपोषण करीत असून, दुष्काळी परिस्थितीतही जनावरांची योग्य काळजी घेतली जाते.
पुसद तालुक्यातील सत्तरमाळ येथे संत सेवालाल महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन २०१३ साली गोरक्षणची स्थापना करण्यात आली. भीमराव लक्ष्मणराव जाधव यांनी दोन गायींपासून गोरक्षणाला प्रारंभ केला. संत सेवादास महाराजांचे परमभक्त असलेल्या भीमराव जाधव यांच्या या गोरक्षणात आता दीडशे गाई आहेत. दुष्काळी परिस्थितीत एवढ्या मोठ्या गार्इंचे पालनपोषण करताना मोठी कसरत करावी लागते. गार्इंची आणि वासरांची काळजी ते मुलाप्रमाणे घेतात.
स्वत:च्या शेतातच मोठा गोठा बांधला असून, घरीसुद्धा शेड बांधले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवरून पाईप टाकून हौद बांधला आहे. भीमराव स्वत:च गार्इंना जंगलात चारायला घेऊन जातात.
त्यांच्या या गोरक्षणात आता २५ वासरे आहेत. त्यांचे विशेष संगोपन केले जाते. आतापर्यंत शासनाने कोणतीही मदत गोरक्षणासाठी दिली नाही. सर्व खर्च स्वत:च करीत आहेत. दुष्काळी परिस्थितीत या गोरक्षणाला मदत करावी अशी माणगी माजी सरपंच सखाराम पंडीत, उपसरपंच देवानंद पंडीत, पोलीस पाटील भाऊराव जाधव, भाऊराव राठोड, बाबूराव राठोड, सुका जाधव यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bhimrao's struggle for protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.