भीमरायांना मानाचा मुजरा
By admin | Published: April 15, 2016 02:08 AM2016-04-15T02:08:37+5:302016-04-15T02:08:37+5:30
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची १२५ वी जयंती पुसद शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंती उत्सव : मोटरसायकल रॅलीने पुसदकरांचे वेधले लक्ष
पुसद : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची १२५ वी जयंती पुसद शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हातात पंचशील आणि निळे ध्वज घेऊन काढण्यात आलेल्या मोटरसायकल व अभिवादन रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले.
येथील डॉ. आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या सकाळी ८ वाजता रमेश सरागे, भीमराव कांबळे, महेश खडसे, डॉ. राजेश वाढवे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. महिला मंडळाच्यावतीने सामुहिक बुद्धवंदना सादर करण्यात आली. त्यानंतर आमदार मनोहरराव नाईक यांनी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ््या माल्यापर्ण करून अभिवादन केले.
तसेच नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, समितीचे अध्यक्ष राजेश वाढवे, माजी अध्यक्ष महेश खडसे, भीमराव कांबळे, डॉ. मो. नदीम, आप्पाराव मैंद, नगरसेविका नीता पवार, शीतल वानखडे, बंडू राऊत यांच्यासह अनेकांनी बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली.
सकाळी ९ वाजता पुसद शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. शहराच्या विविध मार्गाने घोषणा देत या रॅलीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ््याला माल्यापर्ण करून दुपारी कडक उन्हात भव्य अभिवादन रॅलीला सुरूवात झाली. शहरातील विविध वार्डातील अनेक रॅली शिवाजी चौकात आल्या आणि तेथून भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठाले कटआऊट, डीजे यात सहभागी झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अनिल कुरळकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)