पुसदमध्ये भीमरायाला मानाचा मुजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 09:42 PM2018-04-14T21:42:10+5:302018-04-14T21:42:10+5:30

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त भीम सैनिकांनी त्यांना मानाचा मुजरा केला. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आले.

Bhimraya's Mumra in Pusad | पुसदमध्ये भीमरायाला मानाचा मुजरा

पुसदमध्ये भीमरायाला मानाचा मुजरा

Next
ठळक मुद्देडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात : शोभायात्रा, दुचाकी रॅलीने वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त भीम सैनिकांनी त्यांना मानाचा मुजरा केला. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आले.
स्थानिक महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या पुढाकारात येथील डॉ.आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सकाळी अ‍ॅड.अप्पाराव मैंद, भीमराव कांबळे, धनंजय अत्रे, विश्वास भवरे, महेश खडसे, सूरज वरठी, राजू साळुंके, भाऊ अघम, कालू पहेलवान, प्रा.प्रमोद दवणे, पंकज जयस्वाल, भगवान हनवते, सुधाकर जाधव, राहूल कांबळे आदींनी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण केले. यावेळी माजी प्राचार्य बनसोड यांच्या मार्गदर्शनात सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्ष अनिताताई नाईक, आमदार मनोहरराव नाईक यांनी डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. प्रज्ञापर्व समितीचे अध्यक्ष सूरज वरठी यांच्यासह शहरातील मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर सकाळी ९ वाजता शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीला ठाणेदार अनिलसिंह यांनी निळी झेंडी दाखविली.
शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करून ही रॅली डॉ.आंबेडकर चौकात पोहोचली. तेथे रॅलीचा समारोप झाला. दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन रॅली काढण्यात आली. शहरातील विविध वॉर्डातील लहान मोठ्या रॅली शिवाजी चौकात एकत्र आल्या. तेथून मोठ्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य कटआऊट, विविध देखावे व डिजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. सुभाष चौकात ययाती नाईक मित्रमंडळ व निशांत बयास मित्रमंडळातर्फे भोजनाची तर विविध सामाजिक संस्थानतर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल, ठाणेदार गौतम यांच्या मार्गदर्शनात दोन सहायक पोलीस निरीक्षक, सहा पोलीस उपनिरीक्षक, ९० कर्मचारी व गृहरक्षक दलाचे १५ जवान बंदोबस्तासाठी तैनात होते. या शिवाय मिरवणुकीवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर होती.
मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी प्रज्ञापर्व समितीचे अध्यक्ष सूरज वरठी, माजी अध्यक्ष महेश खडसे यांच्या मार्गदर्शनात पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Bhimraya's Mumra in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.