भुलगड तलावाच्या पाण्यासाठी कचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 09:25 PM2019-02-11T21:25:35+5:302019-02-11T21:26:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : राळेगाव तालुक्याच्या भुलगड तलावाचे पाणी सिंचनासाठी मिळावे, यासाठी सोमवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राळेगाव तालुक्याच्या भुलगड तलावाचे पाणी सिंचनासाठी मिळावे, यासाठी सोमवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. वंचित बहुजन आघाडी, भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने या शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
मागील १५ वर्षांपासून वाढोणाबाजार, चिखली, रिधोरा परिसरातील शेतकऱ्यांना भुलगड तलावाचे पाणी सिंचनासाठी मिळत नाही. पाटबंधारे विभागाची यासाठी टाळाटाळ सुरू आहे. बेंबळा प्रकल्पाशी जोडून सिंचनाची व्यवस्था करून देण्यात यावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख नईम शेख रहीम यांनी या शेतकऱ्यांचे नेतृत्त्व केले. प्रश्न निकाली न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष (पूर्व) रणधीर खोब्रागडे, जिल्हा प्रवक्ता राजा गणवीर, सुभाष बहादुरे, शैलेश भानवे, विशाल पोले, सचिन शंभरकर, शेख सलीम, खंडेश्वर कांबळे, महिला आघाडीच्या करुणा मून, धम्मावती वासनिक यांच्यासह शेतकरी शेख रहीम, राजू जाधव, गणेश निंबुळकर, मुनजीम शेख, मधुकर खेडोलकर, पुरुषोत्तम गुरनुले, कवडू येरणे, अशोक लाणबले, अनिल गाडगे, नाना येरणे, मोहन गुजरकर, संजय चिमुरकर आदी उपस्थित होते.