बीएचआर गुंतवणूकदारांची ‘सीआयडी’कडे धाव

By admin | Published: August 10, 2016 01:09 AM2016-08-10T01:09:06+5:302016-08-10T01:09:06+5:30

जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) को-आॅपरेटीव्ह मल्टिस्टेट पतसंस्थेद्वारे फसवणूक झालेल्या

BHR runs the investor's 'CID' | बीएचआर गुंतवणूकदारांची ‘सीआयडी’कडे धाव

बीएचआर गुंतवणूकदारांची ‘सीआयडी’कडे धाव

Next

प्रतिसाद : फसवणुकीचा आकडा वाढतोय
यवतमाळ : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) को-आॅपरेटीव्ह मल्टिस्टेट पतसंस्थेद्वारे फसवणूक झालेल्या आणखी डझनावर गुंतवणूकदारांनी राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाकडे तक्रारी नोंदविण्यासाठी धाव घेतली आहे.
बीएचआरने यवतमाळ जिल्ह्यातील ६२ गुंतवणुकदारांची दोन कोटी ५१ लाख ५४ हजार ७४१ रुपयांनी फसवणूक केली आहे. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात १० एप्रिल २०१५ रोजी जगदीश ब्रिजलाल जयस्वाल (जवळा ता. आर्णी) यांच्या तक्रारीवरून तब्बल २८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला गेला. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक एस.टी. खाटपे यांनी बीएचआरकडून फसवणूक झालेल्या इतरही गुंतवणूकदारांनी तक्रारी दाखल करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन ‘लोकमत’च्या माध्यमातून केले होते. त्या आवाहनाला आतापर्यंत डझनावर गुंतवणुकदारांनी प्रतिसाद दिला आहे. बीएचआरकडून आपली नेमकी किती रुपयांनी फसवणूक झाली याची माहिती त्यांनी सीआयडीपुढे उघड केली आहे. त्यामुळे फसवणुकीचा अडीच कोटींचा आकडा आता वाढतो आहे. जिल्ह्यात बीएचआरकडून फसवणूक झालेले आणखीनही गुंतवणूकदार असण्याची शक्यता असून त्यांनीही पुढे येण्याचे आवाहन सीआयडीने यापूर्वीच केलेले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
 

Web Title: BHR runs the investor's 'CID'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.