बँकांकडून विविध सेवा करांच्या नावावर मोठी वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 09:53 PM2018-04-04T21:53:04+5:302018-04-04T21:53:04+5:30

Big Recovery on Banks in Various Service Taxes | बँकांकडून विविध सेवा करांच्या नावावर मोठी वसुली

बँकांकडून विविध सेवा करांच्या नावावर मोठी वसुली

Next
ठळक मुद्देजिल्हा बँक आघाडीवर : ग्राहकांना अकारण भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांच्या सेवा आता ग्राहकांना लुबाडणाऱ्या ठरत आहेत. बँका आपल्या ग्राहकांकडून विविध सेवांच्या नावाखाली खातेदारांच्या खात्यातून परस्पर रक्कम कापून आपल्या खिशात भरत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची व सर्वसामान्य जनतेची बँक म्हणवून घेणारी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वांत आघाडीवर असल्याचे खातेदारांच्या लक्षात आले आहे.
कधीकाळी बँकाच्या सेवा मोफत असायच्या. ग्राहकांचे बचत खाते व ठेवखात्यात असलेल्या रकमेतून मिळणाऱ्या जादा व्याजावर बँकाचा नफा ठरायचा. त्या नफ्यातून बँका आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्च करूनही बँकाना फायदा व्हायचा. मात्र जेव्हापासून बँकामध्ये संगणकीकरणाचा प्रवेश झाला, तेव्हापासून बँका पूर्णपणे व्यावसायीक बनल्या आहेत. आता कोणतीही बँक ग्राहकांना मोफत सेवा देत नाही, तर विविध सेवांच्या नावाखाली खातेदारांच्या खात्यातून परस्पर रक्कम कपात करते. ही रक्कम ग्राहकांना नगण्य वाटत असली तरी लाखो खातेदारांकडून करोडो रूपयांची माया जमवून बँका आपला खिसा गरम करून घेत आहे. विविध सेवांचे दरही बँकनिहाय वेगवेगळे दिसून येत आहे. यामध्ये यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक इतर बँकेच्या तुलनेत अधिक वसुली करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका खातेदाराने त्यांच्या विविध बँकाच्या खात्यातील कापलेली रक्कम तुलनात्मक मांडली. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एटीएम कार्डाचे वार्षिक शुल्क १७७ रूपये, वार्षिक सेवा कर ५९ रूपये व एसएमएस चार्जेसचे ७०.८० रूपये, असे ३०६.८० रूपये ग्राहकांच्या खात्यातून कपात केले आहे. वास्तविक पाहता जिल्हा बँकेचे स्वत:चे एटीएम जिल्ह्यात कोठेही नाही. यस बँकेच्या भरवशावर ही सेवा सुरू आहे. मात्र पुसद अर्बन बँकेने ग्राहकांकडून वसुल केलेले ईन्सीडेन्सी चार्जेसचे १०८ रूपये ग्राहकांना पुन्हा परत केले आहे, तर भारतीय स्टेट बँकेने एटीएम कार्डाची वार्षिक फि १४७ रूपये व एसएमएस चार्जेसचे २४ रूपये, असे १७१ रूपये कपात केले आहे. एकंदरीत ग्राहकांना बँकाचे संगणकीकरण तोट्यात आणणारे ठरत आहे.
शेतकऱ्यांच्या हिताची बँक कशी?
जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या हिताची बँक म्हणून ओळखली जाते आणि याच बँकेद्वारे शेतकऱ्यांकडून विविध सेवा करांच्या नावावर मोठी रक्कम वसुली केली जात असल्याने ही बँक शेतकºयांच्या हिताची कशी असा प्रश्न विचारला जात आहे.

Web Title: Big Recovery on Banks in Various Service Taxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.