आरटीओ ‘वायूवेग’चे कोट्यवधींचे उडान

By admin | Published: November 23, 2015 02:03 AM2015-11-23T02:03:09+5:302015-11-23T02:03:09+5:30

जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक बिनबोभाटपणे सुरू आहे. या वाहतुकीच्या नियंत्रणासाठी परिवहन विभाग कार्यालयाने स्थापन केलेल्या वायू वेग ....

Billions of flights of RTO 'air force' | आरटीओ ‘वायूवेग’चे कोट्यवधींचे उडान

आरटीओ ‘वायूवेग’चे कोट्यवधींचे उडान

Next

या दलालांकडून मिळते ट्रकची यादी
महिन्याच्या १ तारखेला पथकातील अधिकाऱ्याकडे ट्रक क्रमांकाची यादी दिली जाते. हे काम ठाणे एसीबीच्या जाळ्यात अडकलेला आणि परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्यावसायिक भागिदारी असलेला नगर येथील रोमी नामक दलालाकडून केली जाते. या शिवाय अमरावती येथील अजय यादव, औरंगाबादचा पाल, वणीतील दस्तगिर, धुळे येथील जनबंधू, नाशिकच्या रॉयलकडून प्रत्येक महिन्याला रायल्टी दिली जाते.
ओव्हरलोडला संमती : निर्देशाची पायमल्ली
सुरेंद्र राऊत यवतमाळ
जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक बिनबोभाटपणे सुरू आहे. या वाहतुकीच्या नियंत्रणासाठी परिवहन विभाग कार्यालयाने स्थापन केलेल्या वायू वेग पथकाकडूनच मूक संमती असल्याने लांब पल्ल्यावर चालणारे ट्रक क्षमतेपेक्षा तिप्पट माल घेवून जात आहे. यात महिन्याकाठी दीड कोटीची उलाढाल होत असून वरिष्ठांपासून सर्वांचेच हात ओले केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिल्यानंतरही परिवहनचे अधिकारी जुमानत नसल्याचे दिसत आहे.
वणी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा तसेच मुंबई, नाशिक, धुळे येथून मोठ्या प्रमाणात ट्रक वाहतूक होते. जिल्ह्याच्या सिमेतून या ओव्हरलोड ट्रकला सुखरूप प्रवास करता यावा यासाठी महिन्याकाठी कोट्यवधींची उलाढाल केली जात आहे. दहा चाकी ट्रकची भार वाहन क्षमता १६ ते १७ टन आहे. प्रत्यक्षात मात्र ४२ टन माल नेला जातो. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहे. रस्ते वाहतूक धोकादायक झाली असून क्षमतेपेक्षा अधिक जड वाहने गेल्याने अल्पावधीतच रस्ते उखडत आहे. या सर्व प्रकाराला निर्बंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी परिवहन विभागातील अधिकारी व वाहतूक निरीक्षकांची बैठक घेवून विशेष सूचना दिल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून स्वतंत्र पथकही तयार करण्यात आले होते. त्याशिवाय परिवहन विभागाचे वायूवेग पथक या ओव्हरलोड वाहतुकीसाठी काम करत आहे.

Web Title: Billions of flights of RTO 'air force'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.