कोट्यवधींची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 06:00 AM2020-02-01T06:00:00+5:302020-02-01T06:00:22+5:30
राष्ट्रीयीकृत बँकांचे विलीनीकरण थांबवा, वेतनवाढीचा करार करा, पाच दिवसांचा आठवडा करा आदी मागण्यांसाठी नऊ संघटना संपात सहभागी झाल्या आहेत. जिल्ह्यात स्टेट बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांनी संपात सहभाग नोंदविला. शनिवारीही संप कायम राहणार आहे. यामुळे सोमवारपर्यंत बँकांचा व्यवहार बंद राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात देशभरातील बँकांनीसंप पुकारला आहे. यामुळे जिल्ह्यात कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली. संपाच्या पहिल्याच दिवशी एटीएमवर रांगा लागल्याने दुपारनंतर एटीएम रिकामे झाले.
राष्ट्रीयीकृत बँकांचे विलीनीकरण थांबवा, वेतनवाढीचा करार करा, पाच दिवसांचा आठवडा करा आदी मागण्यांसाठी नऊ संघटना संपात सहभागी झाल्या आहेत. जिल्ह्यात स्टेट बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांनी संपात सहभाग नोंदविला. शनिवारीही संप कायम राहणार आहे. यामुळे सोमवारपर्यंत बँकांचा व्यवहार बंद राहणार आहे.
शुक्रवारी दिवसभर एटीएममध्ये चिक्कार गर्दी होती. नंतर एटीएमही रिकामे झाले. अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. महाराष्ट्र बँकेसमोर कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापन आणि केंद्र शासनाविरोधात निदर्शने केली. यावेळी रवींद्र विरकर, नितीन सुलभेवार, संतोष पंधरे, गिरीधर खडसे, क्रिष्णा बनसोड, प्रियंका भगत यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.
लागोपाठ तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने कर्मचारी, व्यापाऱ्यांसह सामान्य जनतेचे व्यवहार रखडणार आहे. सर्वांनाच सोमवारपर्यंत बँक व एटीएममधून पैसे काढणे दुरापास्त होणार आहे. एटीएममध्ये ठणठणाट असल्याने अनेकांचे व्यवहार खोळंबल्याने आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे.
कापूस चुकारे अडकले
शेतकºयांचे चुकारे राष्ट्रीयीकृत बँकांच्या खात्यात जमा केले आहेत. मात्र संपामुळे चुकारे मिळविण्यासाठी शेतकºयांना सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.