अनेक कार्यालयांतील बायोमेट्रिक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:49 AM2021-09-24T04:49:23+5:302021-09-24T04:49:23+5:30
प्रवासी निवारे झाले जीर्ण पांढरकवडा : तालुक्यातील प्रवासी निवाऱ्याची देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारे दुरवस्थेत ...
प्रवासी निवारे झाले जीर्ण
पांढरकवडा : तालुक्यातील प्रवासी निवाऱ्याची देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारे दुरवस्थेत आहेत. त्यामुळे या प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी आहे. अनेक निवारे जीर्ण असून त्या सभोवताल मोठ मोठी झाडे-झुडुपे वाढलेली आहे. त्यामुळे तेथे सरपटणाऱ्या प्राण्यांचाही वावर असतो. तसेच निवाऱ्यातील बैठक व्यवस्था मोडकळीस आल्याने नागरिकांना तेथे धड बसतासुद्धा येत नाही. त्यामुळे जीर्ण निवाऱ्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
वाय पॉइंटवर गतिरोधक उभारा
पांढरकवडा : शहराचे प्रवेशद्वार असलेले वाय पॉइंटवर राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने वाहने धावत असतात. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याठिकाणी नेहमी अपघात होत असल्याने येथे गतिरोधक उभारण्याची मागणी वारंवार केली जात आहे. परंतु या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.
सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न कायम
पांढरकवडा : तालुक्याच्या विकासाकडे लोकप्रतिधिनींचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात असून, तालुक्यात आजही सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न कायम आहे. तालुक्यात अनेकांच्या हाताला काम नाही. परिसरात एकही उद्योग उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांची फौज तयार होताना दिसून येत आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांमध्ये नैराश्याचे वातावरण दिसून येत आहे.