Bird Flu : यवतमाळ जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव; मृत मोराचे नमुने पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 03:38 PM2021-01-16T15:38:11+5:302021-01-16T15:39:41+5:30
Yavatmal bird flu Update : आर्णी तालुक्यातील खंडाळा येथे 8 मोरांचा मृत्यू झाला होता. ते नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले होते.
यवतमाळ : जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला असून, आर्णी तालुक्यातील खंडाळा येथील मृत मोराचे नमुने आले पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
आर्णी तालुक्यातील खंडाळा येथे 8 मोरांचा मृत्यू झाला होता. ते नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. तेच नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे खंडाळा गाव अलर्ट झोन घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यात राळेगाव तालुक्यातील खैरी गावात सुद्धा 150 कोंबड्याच्या संशयास्पद मृत्यू झाला आहे. या ठिकाणीपशु वैद्यकीय अधिकारी रवाना झाले आहे. पांढरकवडा तालुक्यातील लिंगटी येथे 494 कुकुट पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाला अलर्ट मोडवर काम करावे लागणार आहे. लोकांनी घाबरून न जाता बॉईल करून मांस खावे असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.