बिरसा मुंडा जयंती
By Admin | Published: November 16, 2015 02:24 AM2015-11-16T02:24:09+5:302015-11-16T02:24:09+5:30
आदिवासी समाजाचे आद्यप्रवर्तक क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती शनिवारी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
पुसद : आदिवासी समाजाचे आद्यप्रवर्तक क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती शनिवारी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. या निमित्त काढण्यात आलेल्या अभिवादन रॅलीला शिवाजी चौकात आमदार मनोहरराव नाईक व जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे यांनी पिवळी झेंडी दाखवून सुरूवात केली.
तत्पूर्वी सर्व मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ही मिरवणूक सुभाष चौक, नगिना चौक, गांधी चौक या मार्गे जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रॅलीचा समारोप झाला. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, आदिवासी समाजसेवी माधवराव वंजारे, मुख्याधिकारी अजय कुरवाडे, परंशराम डवरे, गणेश इंगळे, अरुण कळंबे, आशा पांडे, शरद मैंद, सतीश बयास, डॉ. मोहम्मद नदीम, डॉ. अकिल मेमन, महेश खडसे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
यशस्वितेसाठी पांडुरंग व्यवहारे, मारोती भस्मे, सखाराम इंगळे आदींसह अनेकांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)
हिवरी येथे बिरसा मुंडा जयंती
हिवरी : यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथे महानायक क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची १४० वी जयंती शनिवारी हेडंबादेवी समोरील मैदानात उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश सचिव, साहित्यिक दशरथ मडावी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मदन येरावार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष किरण कुमरे, गुलाबराव कुडमते, पवन आत्राम, अरविंद मुडमते, सुरेश कनाके, विजय मुंधडा, शंकरराव कुमरे, नामदेव कोडापे, रमेश भिसनकर, सरपंच सुवर्णा कुमरे, वाटखेडचे सरपंच राहुल पारधी, आनंद मडावी, पोलीस पाटील दिगांबर शहारे, गजानन शहारे आदींची उपस्थिती होती. यावेळी बिरसा मुंडा यांच्या फलकाचे अनावर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ढेमसा नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी मोहन सिडाम, अंकुश मेश्राम, काशिनाथ कुमरे, रामप्रसाद मडावी, अक्षय कुमरे, अभिजित पेंदोर, निलेश जुमनाके, दीपक येरमे, प्रवीण कुमरे, अजय शहारे, पद्माकर शहारे, अमोल महेर, अंबादास कुमरे आदींसह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)